Agriculture news in marathi;Grant of Mahabiyej soyabean seed for Khorpi announces grants | Agrowon

खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला अनुदान जाहीर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर बियाणे  ग्राम बीजोत्पादन योजना तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रामुख्याने सोयाबीनचे बियाणे अनुदानावर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. 

अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर बियाणे  ग्राम बीजोत्पादन योजना तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रामुख्याने सोयाबीनचे बियाणे अनुदानावर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. 

या हंगामात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत जेएस ९३०५ व एमएयूएस ७१ या वाणाचे ९९ हजार ३२५ क्विंटल आणि जेएस ३३५ या वाणाचे ८३ हजार १७५ क्विंटल बियाण्याला शासनाचे क्विंटलला १५०० रुपये अनुदान जाहीर झाले आहे. सध्या सोयाबीनच्या ३० किलो वजनाच्या एका बॅगची किमत १६८० रुपये असून अनुदानावर १३८० रुपयांना ही बॅग मिळेल, अशी माहिती मुख्य विपणन व्यवस्थापक प्रकाश ताटर यांनी दिली. महाबीजने या हंगामासाठी सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, धान व इतर बियाणे मिळून सुमारे आठ लाख क्विंटलपेक्षा अधिक  बियाणे नियोजन केले होते. यात प्रामुख्याने सोयाबीनचे सहा लाख ९६ हजार क्विंटल बियाणे आहे. या बियाण्यांपैकी पावणे दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणे ग्राम बीजोत्पादन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत गळीतधान्य तेलताड अभियानातून अनुदानावर दिले जाणार आहे.

ग्रामबीजोत्पादन अभियानात ९९३२५ क्विंटल बियाण्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान जाहीर झाले. हे बियाणे परमिटवर वाटप केले जाईल. एक एकरासाठी प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे मिळू शकेल. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत गळीतधान्य तेलताड अभियानातून १५ वर्षांच्या आतील प्रमाणित बियाणे वाणास २५०० प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे. प्रात्यक्षिक योजनेचे बियाणे कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत वाटप केले जाईल. यासाठी कृषी विभागाकडून परमिट वितरित केले जातील.

धानालाही अनुदान
ग्रामबीजोत्पादन योजनेतून धानाच्या प्रमाणीत असलेल्या सुवर्णा, एमटीयू १०१०,  एमटीयु १००१, आयआर ६४ , पीकेव्ही एचएमटी, जेजीएल १७९८ या वाणांच्या बियाण्यांस १२०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळेल.
 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...