agriculture news in Marathi,grapes orchid stuck in disease in Sangali Districts,Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता रोगांचा विळखा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने यंदा जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपून काढले. खरीप पिकांची मोठी हानी झाली. कृषी विभागाकडे नोंद असलेल्या ६१ हजार ८३२ एकर द्राक्षबागांपैकी अंदाजे ४५ हजार ५३७ एकर द्राक्षबागा अतिपाऊस आणि रोगाला बळी पडल्या आहेत. परिणामी एकरी नुकसानीचा आकडा वाढून चार लाखांचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना १ हजार ८०० कोटींहून अधिक फटका बसला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने यंदा जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपून काढले. खरीप पिकांची मोठी हानी झाली. कृषी विभागाकडे नोंद असलेल्या ६१ हजार ८३२ एकर द्राक्षबागांपैकी अंदाजे ४५ हजार ५३७ एकर द्राक्षबागा अतिपाऊस आणि रोगाला बळी पडल्या आहेत. परिणामी एकरी नुकसानीचा आकडा वाढून चार लाखांचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना १ हजार ८०० कोटींहून अधिक फटका बसला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे आणि कीड-रोगांमुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढेल, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील उच्चांकी तब्बल ८ हजार ९८७ मिलिमीटर पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तब्बल १७६ टक्के हा पाऊस ठरला. पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्षबागांमध्ये गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले होते. मात्र अशाही स्थितीत द्राक्षबागा रोगाला बळी पडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी दिवसातून चार-चार वेळा बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या. पण शेतकऱ्यांना बागा वाचविण्यात यश आले नाही.

ऐन छाटणी हंगामात पावसाने झोडपून काढल्याने केलेली मेहनत, सारा खर्च पावसाच्या पाण्यासोबतच वाहून गेला. फुलोऱ्‍यातील बागांमध्ये घडकूज झाली. तयार झालेल्या बागांची मणीगळ सुरू झाली आहे. अनेक बागांत विक्रीसाठी तयार झालेल्या मण्यांना तडे जात आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतू या मागणीकडे सराकारने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. 

आगळगावमध्ये द्राक्ष घड फेकण्याची वेळ
आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्याने कुजवा व दावण्या रोगाच्या प्रादुर्भावाने सर्व द्राक्ष घड ओढापात्रात फेकण्याची वेळ आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला असतो. तरीही शेतकऱ्यांनी स्वतःच्या जिद्दीवर द्राक्षबागांचे मळे फुलवले, प्रसंगी टॅंकरने पाणी आणून बागा जगवल्या. मात्र, येथील शेतकऱ्यांवरही रोगग्रस्त सर्व द्राक्षे वाहत्या ओढ्यात फेकून द्यावी लागली. 

तालुकानिहाय द्राक्षबागांचे झालेले नुकसान (एकरमध्ये)

तालुका  क्षेत्र   नुकसानग्रस्त क्षेत्र    नुकसान (कोटींत)
मिरज    १८१७५  १२७२२   ५०९
वाळवा  २२८०  १७१०  ६९
आटपाडी   ४९१    १४७    ६  
तासगाव  १९८००   १६८३० ६७३
कडेगाव  ३१६   १५८  ६
खानापूर   १९५५   १७६०   ७०
पलूस ३०८५ २१६० ८६
क. महांकाळ ४१००  ३०७५   १२३
जत    ११६३०   ६९७५ २७९
एकूण   ६१८३२   ४५५३७ १८२१

      


इतर अॅग्रो विशेष
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...