‘सालेभाटा‘द्वारे होणार ४९ गावांत हरितक्रांती

‘सालेभाटा‘द्वारे होणार ४९ गावांत हरितक्रांती
‘सालेभाटा‘द्वारे होणार ४९ गावांत हरितक्रांती

 भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांतीचे स्वप्न साकार होण्याच्या उद्देशाने सालेभाटा येथील उपसा सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व नाहरकतीसाठी लवकरच राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, शेतमजूर संघटनेतर्फे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

पवनी तालुक्‍यातील गोसे प्रकल्प जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे. लाभ क्षेत्रासोबतच पाणलोट क्षेत्रासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात आला. आमदार फुके यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली. त्यांनी याची दखल घेत सिंचन भवन नागपूर येथे जलसंपदा विभागाची बैठक बोलावली. गोसे प्रकल्पाचे मुख्य अभियंता कांबळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

बैठकीत धारगाव टप्पा क्रमांक १ व २ या कामाच्या मंजुरीचा विषयावर चर्चा झाली. या संदर्भाने यापूर्वी फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. धानगाव टप्पा क्रमांक दोनचे नाव बदलून सालेभाटा उपसा सिंचन करावे, यासाठी चर्चा झाली. सालेभाटा उपसा सिंचनाच्या माध्यमातून ४९ गावात हरितक्रांती होणार आहे. बैठकीला संघटनेचे मनोज पटले, सुरेश बोपचे, संजय रामटेके, सुधारकर हटवार, महात्मा शिंदे, चिंतामण कोडवते, राधेशाम दिघोरे, शामा सोनटक्‍के उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com