संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस हजार लिटर : पशुसंवर्धनमंत्री जानकर

संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस हजार लिटर ः पशुसंवर्धनमंत्री जानकर
संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस हजार लिटर ः पशुसंवर्धनमंत्री जानकर

वर्धा ः दूध संघाला केवळ ११ हजार लिटर खरेदीची मर्यादा असल्याने अनेक दूध उत्पादकांकडे दूध तसेच राहत होते. त्याची दखल घेत दूध संघाची मर्यादा ११ हजार लिटरवरून २० हजार लिटर करण्याचे आदेश पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिले. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.  नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात शेतीपूरक पशुपालनावर शेतकऱ्यांचा भर आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दूध उत्पादनदेखील होते. परंतु जिल्हा दूध संघाला केवळ ११ हजार लिटर दूध खरेदीची मर्यादा होती. त्यामुळे अनेक पशुपालकांकडील दूध शिल्लक राहात होते. ही समस्या आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या लक्षात आणून देण्यात आली. आमदार भोयर व आमदार समीर कुणावार यांनी अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकारात आमदार कुणावार व डॉ. भोयर यांनी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. या भेटीत जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांची समस्या मांडण्यात आली. त्यासोबतच जिल्हा दूध संघाच्या संकलनात वाढ करण्याची मागणी केली गेली. महादेव जानकर यांनीदेखील याची तत्काळ दखल घेत दूध संकलन मर्यादा ११ हजार लिटरवरून २० हजार लिटर करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com