नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा दीड हजार गावांतील शेतीला तडाखा

पीक नुकसान
पीक नुकसान

नगर : ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध झालेल्या प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ५१९ गावांतील ३ लाख ६४ हजार १४ हेक्टरवरील पिकांना अवेळी आणि अतिवृष्टीचा दणका बसला आहे. नगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ५ लाख ९१ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यातील या पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार ५१९ गावांतील ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना फटका असल्याचा प्राथमिक नजर अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयाने व्यक्त केला आहे. कृषी विभागासह महसूल विभागाच्या पथकाने पिकांची प्राथमिक पाहणी सुरू केली. यात जिल्ह्यातील १ हजार ५१९ गावांतील ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला असल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले पिकांचे नुकसान आणि ३३ टक्क्यांपेक्षा कमी झालेले नुकसान अशी स्वतंत्र वर्गवारी केली जात आहे. त्यात ३ लाख ६४ हजार हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक तर ३५ हजार ७८७ हेक्टर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने तयार केलेला हा प्राथमिक नुकसानीचा अंदाज जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सायंकाळी सादर केला आहे. आता पुढील आठवडाभरात कृषी आणि महसूल विभागात शेतीच्या क्षेत्रानुसार अंतिम अहवाल तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाईचा निर्णय होणार आहे. जिल्ह्यात खरिपासाठी ५ लाख ९१ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यातील ३ लाख ६४ हजार १४ हेक्टवरील पिकांना फटका बसला आहे.

बाधित पिके सोयाबीन, मका, बाजारी, कापूस, गिणी गवत, ऊस, भाजीपाला, कडवळ, कांदा, केळी, भुईमूग, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, भात आणि फळपिके यांचा यात समावेश आहे. तालुकानिहाय बाधित गावे अकोले :  १९१, संगमनेर ; १७१, पाथर्डी ; १३७, नेवासा : १२८, श्रीगोंदा : ११५, कर्जत : ११४, श्रीगोंदा : ११२, पारनेर : ९७, राहुरी : ९६, जामखेड :  ८७, कोपरगाव : ७९, नगर :  ७५, राहाता : ६१,  श्रीरामपूर : ५६ या गावांचा समावेश आहे. अंदाजे बाधित शेतकरी र्श्रीगोंदा    ५७,३७०,  कोपरगाव    ५७,३३६,  पाथर्डी     ५४,२४३,  नेवासा    ५३,५००,  शेवगाव    ५२,४३५,  जामखेड    ३०,४४२,  श्रीरामपूर     ३०,१५०,  नगर     २९,३४३,  अकोले    २७,३०९,  राहाता     २६,००० राहुरी    २६,००० संगमनेर    २३,९३५,  कर्जत    ११,६६१  पारनेर    ५,७५५  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र (हेक्टर)  राहाता     ३०,२७५,  नेवासा    ३९,८००,  कोपरगाव     ३५,१३२,  कर्जत     ४३५  श्रीगोंदा     २८,६८५,  संगमनेर     ५२,५२०,  अकोले    १३,१३२,  श्रीरामपूर     ३२,३०७,  शेवगाव    ३९,८०२,  जामखेड     १७,५३३,  नगर     १८,११६,  पाथर्डी    ४०,४०८,  पारनेर     ४,११३,  राहुरी     १९,३५०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com