महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
अॅग्रो विशेष
अतिवृष्टीचा १६ जिल्ह्यांना फटका
राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये मागील आठ दिवसांतील अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करून मदत व पुनर्वसन विभागाला अहवाल सादर केल्यानंतर मदतीची मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल. केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
- हरी बाबटीवाले, उपसंचालक, कृषी
सोलापूर : देशातून माॅन्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये नाशिक, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल १३ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे सुमारे आठ हजार ७९० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या पंचनाम्याचे अहवाल मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांकडे प्राप्त झाल्यानंतर मदतीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केंद्रीय पथकांकडून केली जाणार आहे. त्यासाठी किमान तीन पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ मधून भरपाई दिली जाणार आहे.
तत्पूर्वी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह अन्य भागात पुरामुळे झालेल्या भरपाईची रक्कमही त्याचवेळी दिली जाईल, असा अंदाज राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, दिवाळी सुट्ट्यांमुळे पंचनाम्याला विलंब होत असून शेतकऱ्यांना मदतीसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल, असेही सांगण्यात आले.
ठळक बाबी...
- मान्सून परतल्यानंतर राज्यात आठ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ
- मराठवाडा, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम विदर्भात सर्वाधिक फटका
- प्राथमिक अंदाजानुसार १३ लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे नुकसान
- जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश : सुट्ट्यांमुळे पंचनामे लांबणीवर
- १५ नोव्हेंबरपर्यंत पंचनाम्याचे अहवाल देण्याचे निर्देश : केंद्रीय पथकांकडून होणार पाहणी
- भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, भुईमूग, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, ज्वारी, कांद्याचे मोठे नुकसान
- 1 of 435
- ››