मराठवाड्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठे, मध्यम, लघू अशा ८७२ धरणांत पुरेसा पाणीसाठा झ
ताज्या घडामोडी
खानदेशात अनेक भागांत दमदार पाऊस
जळगाव : खानदेशात अनेक भागांत बुधवारी (ता. २६) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही मंडळांमध्ये ४० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे पेरण्यांना गुरुवारी (ता. २७) सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.
जळगाव : खानदेशात अनेक भागांत बुधवारी (ता. २६) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही मंडळांमध्ये ४० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे पेरण्यांना गुरुवारी (ता. २७) सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.
जळगाव जिल्ह्यात गिरणा परिसरातील विशेषतः चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यात चांगला पाऊस झाला. दहीवद, वरखेडे (ता. चाळीसगाव) परिसरात एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाल्यांना पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद दिसत होता. दोन दिवसात गिरणा परिसरात पावसाचे चांगले वातावरण असल्याने शेतीकामांना वेग आला असून कपाशी लागवडीची कामे सुरू झाली आहेत. कळमडू (ता. चाळीसगाव) गावात पावसाने हजेरी लावली. भडगाव, पाचोरा भागातही पेरण्यांना पावसामुळे गती आल्याची माहिती मिळाली.
पाचोरा शहरासह तालुक्यातील जळगाव रस्त्यावरील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गोराडखेडा, सामनेर, नांद्रा, हडसन, नंदीचे खेडगाव या भागात चांगला पाऊस झाला.
सामनेर (ता. पाचोरा) परिसरातील बांबरुड राणीचे, लासगाव, पाथरी भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने आगमन झाले. वादळाचा जोर वाढल्याने अनेक झाडे कोलमडून पडली होती. तर नाल्यांना पाणी आले होते. जामनेर, जळगाव, धरणगाव भागातही पावसाचा जोर होता. बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळात मात्र कमी जोर होता. यावल, रावेर, चोपडा भागातही हलका व मध्यम पाऊस झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर असा सर्वत्र पाऊस जाला. शहादा, तळोदा भागात कोरडवाहू पिकांची पेरणी सुरू झाली. ज्वारी, कापूस, उडीद, मूग पेरणी गुरुवारी अनेकांनी केली.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री भागात हलका ते जोरदार पाऊस झाला. शिरपूर, शिंदखेडा व धुळ्यातील काही गावांमध्ये चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरवात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्येही काही ठिकाणी जलसाठा झाल्याचे सांगण्यात आले.
धुळे तालुक्यात बुधवारी २१ मिलिमीटर, साक्रीमध्ये १५, शिरपुरात २१, शिंदखेडामध्ये २०, नंदुरबारात २४, तळोदामध्ये २५, शहादामध्ये २६, जळगाव तालुक्यात ३१, चोपडामध्ये १८, भुसावळात १३, यावलमध्ये १८, रावेरात २५, जामनेरात २१, चाळीसगावात २४, पारोळामध्ये २३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ कोरडवाहू पिकांची लागवडही सुरू झाली असून, त्याची नेमकी आकडेवारी गुरुवारी सकाळपर्यंत उपलब्ध झालेली नव्हती.
- 1 of 1020
- ››