agriculture news in Marathi,Heavy rain in several places, Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला. तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. नागपूरसह पूर्व विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.

पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला. तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. नागपूरसह पूर्व विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.

अरबी समुद्र ते उत्तर दक्षिण महाराष्ट्र, गुजरात या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. तसेच अरबी समुद्र व गुजरात परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यांची दोन दिवसांनंतर तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात उघडीप राहणार असून काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

मात्र, या कमी दाबाच्या क्षेत्राचा व चक्राकार वाऱ्याचा काही प्रमाणात परिणाम होणार असून आज (ता. २२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्या (ता. २३) विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राच्या परिणामामुळे बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबईत सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर अलिबाग, हर्णे, मुरूड, सुधागड पाली येथेही जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील शिरपूर येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर बोदवड, गिरणा, अक्ककुवा, नेवासा, बारामती, नंदुरबार येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

मराठवाड्यातील मुगट, करखेली, निवघा, सिंधी, मोगाली, सोनखेड, मानवत, दहेली, बिलोली, हदगाव, हिंगोली येथेही मुसळधार पाऊस पडला. विदर्भातील बार्शी टाकळी येथे सर्वाधिक ८२ मिलिमीटर पाऊस पडला. तर 
पातूर, तेल्हारा, चिखलदरा, लखनदूर, बाळापूर, बदलापूर, अकोट, लाखनी, संग्रामपूर, उमरेड येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ असून काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे.  

शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)  
कोकण ः मुंबई ६०, अलिबाग, हर्णे ५०, मुरूड, सुधागड पाली ४०, म्हसळा, पालघर, वसई २०, कानकोन, डहाणू, दापोली, देवगड, गुहागर, जव्हार, खेड, मंडणगड, माथेरान, पोलादपूर, श्रीवर्धन, तलासरी, उरण, विक्रमगड, वाडा, वाकवली १०, 
मध्य महाराष्ट्र ः शिरपूर ६०, बोदवड, गिरणा ४०, अक्कलकुवा, नेवासा ३०, बारामती, नंदुरबार, सुरगाणा २०, भडगाव, देवळा, हरसूल, कळवण, खेड, राजगुरूनगर, मुंडे, नांदगाव, नवापूर, राहाता, रावेर, साक्री, तळोदा, येवला १० 
मराठवाडा ः पाथरी ११०, मुगट ८०, करखेली ८९, निवघा ८३, सिंधी ८५, मोगाली ८५, सोनखेड ७२,  मानवत ७०, दहेली ६९,  बिलोली, हदगाव, हिंगोली ५०, देगलूर, धर्माबाद, कळमनुरी, कंधार, मुदखेड, उमरी ४०, अर्धापूर, घनसांगवी, मुखेड, सेलू, सेनगाव, वैजापूर, वसमत ३०, नायगाव, खैरगाव, परभणी २०, अंबड, औढा नागनाथ, भोकरदन, गंगाखेड, जाफ्राबाद, जळकोट, जिंतूर, लोहा, माहूर, माजलगाव, परतूर, सोयगाव १०, 
विदर्भ ः बार्शी टाकळी ८२, पातूर ७३, तेल्हारा ७१, चिखलदरा, लखनदूर ६०, बाळापूर ५०, बदलापूर ५५, अकोट, लाखनी, संग्रामपूर, उमरेड ४०, अकोला, अंजनगाव, बुलढाणा, मौदा, मोहाडी, रामटेक, रिसोड, यवतमाळ ३०, भामरागड, भंडारा, भिवापूर, चांदूरबाजार, धारणी, खामगाव, कुही, मालेगाव, मलकापूर, मेहकर, पुसद, तुमसर २०, अहिरी, अर्जुनी मोरगाव, बतकुली, चिखली, चिमूर, दारव्हा, दर्यापूर, दिग्रस, गडचिरोली, घाटंजी, कुरखेडा, मंगरूळपीर, तोताळा, मूर्तिजापूर, नांदगाव, काजी, नांदुरा,
परतवाडा, सडकअर्जुनी, शेगाव, सिंदखेड राजा, तिरोरा, झारीझमनी १०, 
घाटमाथा ः कोयना, अंबोणे २०, ताम्हिणी १०, 


इतर ताज्या घडामोडी
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...
‘किसान सन्मान’ निधी : दोष प्रशासनाचा,...जळगाव : शासकीय यंत्रणेकडून बॅंक खात्यासंबंधीची...