सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग: समुद्राच्या किनाऱ्याला धडकणाऱ्या अजस्त्र लाटा, घोंघावणारा वारा, वस्तीत घुसत असलेल्या पाण्यामध्ये सतत होणारी वाढ, यामुळे किनारपट्टीच्या गावातील लोकांनी अख्खी रात्र जीव मुठीत धरून काढली. चक्रीवादळाने किनारी भागाला मोठा तडाखा दिला आहे.  क्यार चक्रीवादळामुळे जिल्ह्यात वादळी वारे वाहत असून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भातशेती कोलमडून गेली असून शेकडो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. वादळामुळे कित्येक ठिकाणी पडझडदेखील झाली आहे. दरम्यान, दोन वाजता क्यार चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकले असल्याचे सांगण्यात येत आहे.क्यार चक्रीवादळाने जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीसह संपूर्ण जिल्ह्यात या वादळामुळे मोठे नुकसान झाले. या वादळामुळे शुक्रवारी दिवसभर किनारपट्टी भागात अतिवृष्टी झाली. मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तीनही तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. वेंगुर्ला आणि मालवण किनारपट्टीला क्यारचा मोठा तडाखा बसला. शुक्रवारी सकाळपासूनच या दोन्ही किनारपट्टीला अजस्त्र लाटा धडकत होत्या. समुद्री उधाणाचे पाणी शिरोडा, उभादांडा, वेंगुर्ला-मांडवी, केळुस, कालवी (ता. वेंगुर्ला) येथे वस्तीत घुसल्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. भात शेतीचे नुकसान... पहा व्हिडिओ मांडवी खाडीपासून ३०० मीटर अतंरावर असलेल्या बहुतांशी घरांमध्ये उधाणाचे पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मालवण तालुक्यातील मेढा, राजकोट, बंदर जेटी, दांडी, वायरी भुतनाथ, देवबाग, तळाशील, आचरा या भागाला क्यारचा जोरदार तडाखा बसला. या भागात मोठी पडझड झाली असून वस्तीत पाणी घुसले होते. देवगड बंदरात ६५० नौका आश्रयाला आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com