Agriculture news in marathi,Heavy rains in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याचे चित्र आहे. तब्बल ३६ तालुक्यात सरासरी २० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी हे जिल्हे पावसाच्या निशाण्यावर राहिले. पाच जिल्ह्यातील मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यातही बीडमधील आंबाजोगाई आणि केज या तालुक्यांना पावसाने चांगलेच धुतले.

मराठवाड्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात सरासरी २० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. ३६ तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यातील चार, बीडमधील १०, लातूरमधील ५, उस्मानाबादमधील ८, परभणीतील ७, तर हिंगोलीतील एका तालुक्याचा समावेश आहे. तऱ अतिवृष्टीच्या २० मंडलांत बीडमधील आठ, लातूरमधील ५, उस्मानाबादमधील ५, नांदेडमधील एक व परभणीतील एका मंडलाचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ४५.७ मिलिमीटर,  बीड जिल्ह्यात ३४.३ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात २५.४ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात २५.४ मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात १८ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यात ११ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात ६.१ मिलिमीटर, तर नांदेड जिल्ह्यात सरासरी ६ मिलिमीटर पाऊस झाला. 

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील केज व आंबाजोगाई हे दोन तालुके पावसाच्या निशाण्यावर होते. केज तालुक्यांत सर्वाधिक सरासरी ७२.९ मिलिमीटर, आंबाजोगाई तालुक्यात सरासरी ६९.४ मिलिमीटर, धारूर ६१.८ मिलिमीटर, पाटोदा ३८.९ मिलिमीटर, बीड २६, आष्टी २०.७, माजलगाव २७.८, परळी ३४.९, वडवणी २८.७, शिरूरकासार ३४.७, तर गेवराई तालुक्यात सर्वांत कमी सरासरी ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरातील आपेगाव, अंजनपूर, तटबोरगाव, देवळा सोमनाथ, बोरगाव, हिवरा, माकेगाव आदी गावशिवारात अतिवृष्टीमुळे पीक पाण्याखाली गेली.

लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी ५०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अहमदपूर तालुक्यातील मन्याड नदीला जोरदार पावसामुळे मोठा पूर आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सरासरी ५१.३ मिलिमीटर, उस्मानाबाद ५३.५, लोहारा ५१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळे (पाऊस मि.मी)

बीड जिल्हा ः पाटोदा १४५.२५, लोखंडी सावरगाव ६८.२५, केज ९३, युसूफ वडगाव ९६.७५, होळ ८७.५०, नांदुरघाट ७०, शिरसाळा ८७.२५, मोहखेड ७७.५०
लातूर ःहरंगुळ ७८.२५, मुरुड ७९.७५, तांदुळजा ६६,भादा ६५.२५, निलंगा ६८.७५

उस्मानाबाद ः ढोकी ८५, तेर ७३.२५, शिराढोण ७१.७५, उमरगा ७०.७५, मुळज ६६.२५. नांदेड ः नाळेश्वर ९८. परभणी ः बाभळगाव ८३.७५


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...