agriculture news in Marathi,History of Chhatrapati Shivaji Maharaj Excluded from book of 4th standard, Maharashtra | Agrowon

चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास वगळला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्यात आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागितला जात असतानाच हा प्रकार पुढे आल्यामुळे सर्व क्षेत्रांतून संताप व्यक्त होत आहे. 

मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्यात आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागितला जात असतानाच हा प्रकार पुढे आल्यामुळे सर्व क्षेत्रांतून संताप व्यक्त होत आहे. 

राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृतीसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूने शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचीही स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून हा प्रकार समोर आला आहे. बालवयातच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा समजावी, यासाठी इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला. मात्र, आता हा जाज्वल्य इतिहासच शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे.

इयत्ता चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना १९९१ मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्या वेळी विरोध झाल्यानंतर चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया यांचा समावेश इतिहासाच्या पुस्तकात केलेला दिसत नाही. केवळ ‘भारतीय लोक’ या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची छोटेखानी माहिती आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय, शिवस्मारकाच्या उभारणीत केलेला अक्षम्य विलंब हे कमी होते म्हणून की काय भाजपा-शिवसेना सरकारने आता चौथीच्या पुस्तकातून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ हद्दपार करण्याचा घाट घातलाय. हे अतिशय दुर्देवी असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी याचा तीव्र निषेध केला आहे.

तर छत्रपती शिवरायांचा या सरकारने केवळ स्वार्थासाठी वापर केल्याचे आता उघड होत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...