agriculture news in Marathi,if farmer Deprived from crop insurance company will be responsible , Maharashtra | Agrowon

पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी जबाबदार : अकोला जिल्हा प्रशासनाचे पत्र

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच, विमा काढलेल्या पिकांचेही अहवाल तयार झालेले आहेत. मात्र, तालुक्यांना विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कमी असल्याने हे अहवाल त्यांच्या स्वाक्षऱ्यांअभावी पडून आहेत. समित्यांनी केलेल्या पंचनाम्याच्या गोषवाऱ्यावर स्वाक्षरी करण्याबाबत विमा कंपन्यांनी आपल्या प्रतिनिधीला तत्काळ सूचना द्याव्यात. भविष्यात पीकविम्यापासून शेतकरी वंचित राहिल्यास कंपनी जबाबदार असेल, असे पत्रच जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला पाठविल्याचे वृत्त आहे.

अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच, विमा काढलेल्या पिकांचेही अहवाल तयार झालेले आहेत. मात्र, तालुक्यांना विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कमी असल्याने हे अहवाल त्यांच्या स्वाक्षऱ्यांअभावी पडून आहेत. समित्यांनी केलेल्या पंचनाम्याच्या गोषवाऱ्यावर स्वाक्षरी करण्याबाबत विमा कंपन्यांनी आपल्या प्रतिनिधीला तत्काळ सूचना द्याव्यात. भविष्यात पीकविम्यापासून शेतकरी वंचित राहिल्यास कंपनी जबाबदार असेल, असे पत्रच जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला पाठविल्याचे वृत्त आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा सर्व्हे संयुक्त समितीने पूर्ण केला असून त्याचे अहवाल तयार झाले आहेत. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढलेला आहे त्यांचेही अहवाल बनविण्यात आलेले आहे. मात्र विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पंचनाम्याच्या गोषवाऱ्यावर स्वाक्षरी केलेली नसल्याने हे प्रस्ताव पुढे सरकलेले नाहीत.

कंपन्यांकडे तालुकास्तरावर पंचनामा करण्यासाठी कमी मनुष्यबळ असल्याने गाव पातळीवर शासन अधिसूचित गठित केलेल्या समितीने पीक नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यावर कंपनी प्रतिनिधीने स्वाक्षरी करणे गरजेचे आहे. परंतु स्वाक्षरी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे पीकविम्याचे अर्ज कृषी कार्यालयात आहेत. हे अर्ज कंपनीने ताब्यात घेऊन शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार पोहोच द्यावी तसेच मार्गदर्शक सुचनानुसार पात्र शेतकऱ्यांना देय नुकसानभरपाई द्यावी.

भविष्यात जर आपत्तीग्रस्त शेतकरी पीकविमा नुकसानभरपाईपासून वंचित राहल्यास त्याला कंपनी सर्वस्वी जबाबदार असेल, असे स्पष्टपणे म्हटले आहे.


इतर बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के...नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने...