Agriculture news in marathi;Impact on sale of alloys in Jalgaon | Agrowon

जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणाम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

जळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. यातच जुलैच्या मध्यापर्यंत असलेली पावसाची अनियमितता आणि जुलैच्या अखेरीस सुरू झालेला संततधार पाऊस आणि महागाई यामुळे जिल्ह्यात सुमारे २५ हजार मेट्रिक टन मिश्रखते पडून आहेत. त्यांचा वापर हवा तसा न झाल्याने कंपन्यांकडून पुरवठाही धीम्या गतीने सुरू आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. यातच जुलैच्या मध्यापर्यंत असलेली पावसाची अनियमितता आणि जुलैच्या अखेरीस सुरू झालेला संततधार पाऊस आणि महागाई यामुळे जिल्ह्यात सुमारे २५ हजार मेट्रिक टन मिश्रखते पडून आहेत. त्यांचा वापर हवा तसा न झाल्याने कंपन्यांकडून पुरवठाही धीम्या गतीने सुरू आहे. 

जुलैमध्ये हवी तेवढी मिश्रखतांची विक्री झाली नाही. जुलैच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. तो अगदी १० ऑगस्टपर्यंत सुरूच होता. यादरम्यान आंतरमशागती, तण नियंत्रण, फवारणी व खते देण्याचेही काम ठप्प झाले. यामुळे खतांची मात्रा अनेक शेतकरी खरिपातील पिकांना देऊ शकले नाहीत. अशातच सद्यःस्थितीत मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी या पिकांची आश्‍वासक वाढ झाल्याने शेतकरी खते देणे टाळत आहेत. फवारणीतूनच संप्रेरके देण्यावर त्यांचा भर आहे. तर कापूस पिकात सध्या काळ्या कसदार, मध्यम जमिनीत हवा तसा वाफसा नसल्याने आंतरमशागत वेगात सुरू नाही. आंतरमशागत व एक फवारणी उरकल्यानंतर कापूस पिकात खतांचा वापर शेतकरी करतील. यामुळे सद्यःस्थितीत किंवा या महिन्यातही मिश्र खतांची उचल हवी तशी झालेली नसल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ७० हजार मेट्रिक टन मिश्र खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. हा यातील निम्मे पुरवठा झाला आहे. परंतु उचल नसल्याने मागील २०-२२ दिवसांपासून मिश्र खतांचा पुरवठा धीम्या गतीने सुरू आहे. तर युरियाची मागणी पुढील आठवड्यात उघडीप कायम राहिली तर वाढेल, असा अंदाज असल्याने त्याचा पुरवठा करून घेण्यावर कृषी यंत्रणांचा भर आहे. या आठवड्यात ५२०० मेट्रिक टन दोन कंपन्यांकडून रेल्वेद्वारे जिल्ह्यात पोचविण्यात आला आहे. एकूण तीन लाख ३० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा हंगामाअखेर होणार आहे. यात युरियाचा सर्वाधिक एक लाख ३० हजार  मेट्रिक टन, पोटॅशचा ६५ हजार तर फॉस्फेटचादेखील ६५ हजार मेट्रिक टन पुरवठा होणार आहे. पोटॅशचा पुरवठादेखील सुरळीत असून, त्याचा पुरवठा ६५ टक्के झाल्याचे सांगण्यात आले. 

 

जिल्ह्यात सर्वच खतांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. सरळ खतांचा जुलैमध्ये वापर झाला. नंतर अतिवृष्टी, वाफसा नसल्याने खतांचा वापर हवा तसा झाला नाही. मिश्र खते अधिक पडून आहेत. सुमारे २५ हजार मेट्रिक टन मिश्रखते विक्रेते, वितरकांकडे आहेत. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

इतर बातम्या
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...