अमरावती जिल्ह्यात पोकरा योजनेचे अनुदान थकले

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध घटकांचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ही योजना देखील पोखरणारी ठरली, असा आरोप काँग्रेसनेकेला आहे.
अमरावती जिल्ह्यात पोकरा योजनेचे अनुदान थकले In Amravati district Pokra scheme grants exhausted
अमरावती जिल्ह्यात पोकरा योजनेचे अनुदान थकले In Amravati district Pokra scheme grants exhausted

अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध घटकांचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यावरूनच इतर योजनांप्रमाणे ही योजना देखील पोखरणारी ठरली, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य तसेच काँग्रेसचे महासचिव प्रकाश साबळे यांनी केला आहे. राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी शिष्टमंडळासोबत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

  प्रकाश साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे, शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या १५ जिल्ह्यांमधील ५१४२ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. फळबाग, तुषार सिंचन, ठिबक, पाइपलाइन, बीजोत्पादन अशा विविध घटकांकरिता योजनेतून १००, ७५ तसेच ५० टक्के अनुदान दिले जाते.  

सन २०१८ ते २०२०-२१ या कालावधीत बीज उत्पादन योजनेत एका शेतकऱ्याकडे एकापेक्षा अधिक मौजात शेती असल्यास त्याची शासन पोर्टलवर नोंदणी होत नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. याच कारणाआड राज्यातील अनेक बीज उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले. युवा शेतकरी शेखर अवघड यांचा देखील या अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये समावेश आहे. शेखर अवघड यांना दहा एकर क्षेत्रावरील बीजोत्पादनाचे अनुदान २०१८- १९पासून मिळालेले नाही.

विशेष म्हणजे प्रकल्प गावातील, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता जमीन धारणेबाबत कोणतीही अट असणार नाही, असे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद आहे, असे असतानाही शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यावरूनच पोखरा योजना शेतकऱ्यांना पोखरणारी असल्याचे सिद्ध होते, असा आरोपही प्रकाश साबळे यांनी केला आहे. 

बीज उत्पादन योजनांमध्ये गत दोन वर्षाचे अनुदान तसेच एका शेतकऱ्यांच्या नावे एकापेक्षा अधिक सात बारा,  ८-अ असणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. याची दखल घेत हा प्रश्‍न तत्काळ निकाली काढावा, अशी मागणी प्रकाश साबळे यांनी कृषिमंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.  शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com