अमरावती विभागातील प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा

अमरावती विभागातील प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा
अमरावती विभागातील प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा

अमरावती : अमरावती विभागात नऊ मोठे, २४ मध्यम तर ४६९ लघुप्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात १०५.४० दलघमी पाणीसाठा झालेला असून त्याची टक्केवारी ५७.३० आहे. तर विभागाच्या अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३.१३ दलघमी पाणीसाठा झाला असून बुलडाणाच्या खडकपूर्णा प्रकल्पात आत्तापर्यंत निरंक जलसाठ्याची नोंद झाली आहे. विभागातील सर्व मोठे, मध्यम व लघू प्रकल्पात एकूण ८३२.४० दलघमी जलसाठा निर्माण झाला असून त्याची २६.२२ टक्केवारी आहे. विभागातील इतर मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा(दलघमी) व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे ः  अमरावती जिल्हा ः  ऊर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ११४.०७ दलघमी पाणीसाठा झाला असून टक्केवारी २०.२२ आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पात ३१.५९ (६८.६१), चंद्रभागा ३२.४१ (७८.५७), पूर्णा २२.१२ (६२.५४), सपन प्रकल्पात ३२.९२ (८५.२८) असा जलसाठा आहे. यवतमाळ जिल्हा ः मोठो प्रकल्प ः  पूस प्रकल्प ३१.३३ (३४.३३), अरुणावती प्रकल्पात १८.९० (११.१४), बेंबळा प्रकल्पात १०५.४० (५७.७० ) जलसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील इतर प्रकल्पात अधरपुस प्रकल्पात ४२.०७ (७०.५५) जलसाठा, सायखेडा प्रकल्पात २७.१८ (१००) , गोकीत १४.१० (३३.०१), वाघाडी १०.४१ (२९.४४), बोरगाव २.७५(४१.६०), नवरगाव ११.११ (८९.०२), अडाण ३.९४ (५.८६) असा जलसाठा निर्माण झाला आहे. अकोला जिल्हा ः  दोन मोठ्या प्रकल्पात पुढीलप्रमाणे जलसाठा झाला आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ३.१६ (३.६२), वान प्रकल्पात ४३ (५२.४७ ) तसेच जिल्ह्याच्या इतर प्रकल्पात निर्गुणा प्रकल्पात १.०९ (३.७८), मोर्णा प्रकल्प ५.५०(१३.२७), उमा व घुंगशी बॅरेजमध्ये निरंक जलसाठ्याची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्हा ः  जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांत पाणीसाठा पुढीलप्रमाणे ः नळगंगा प्रकल्प ९.२७ (१३.३७), पेनटाकळी प्रकल्प २३.२४ (३८.७५) तसेच जिल्ह्याच्या इतर प्रकल्पांत ज्ञानगंगा १७.४८ (५१.५२), पलढग ७.५१ (१००), मस ९.१६ (६०.९०), मन १२.४६ (३३.८३), तोरणा ३.३३ (४२.२१), उतावळी ५.६१ (२८.३५) वा‍शीम जिल्हा ः मोठे प्रकल्प नसून तेथील दोन मध्यम प्रकल्पांत सोनल प्रकल्पात निरंक जलसाठा तर एकबुर्जीमध्ये ३.३३ (२७.८२) जलसाठा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com