चाळीसगाव, भडगाव भागांत तुरळक, शेतकऱ्यांना दिलासा

चाळीसगाव, भडगाव भागांत तुरळक, शेतकऱ्यांना दिलासा
चाळीसगाव, भडगाव भागांत तुरळक, शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव ः जिल्ह्यात सुमारे नऊ ते १० दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हलक्‍या व मुरमाड जमिनीतील पिकांना पावसाची नितांत गरज होती. जिल्ह्यात पावसाची टक्केवारी वाढत असून, सोमवार (ता. २६)पर्यंत सरासरीच्या ७२ टक्के पाऊस नोंदविल्याची माहिती आहे.  जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरामधील काही भागांत मात्र फक्त तुरळक सरी कोसळल्या. या भागात सोमवारी सकाळी आठपर्यंत पाच मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नव्हता. तर जळगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, बोदवड, यावल, भुसावळ या भागांत सोमवारी सकाळी आठपर्यंत (गेल्या २४ तासात) आठ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. सध्या मूग, उडदाच्या शेंगा भरत आहेत. ज्वारीही निसवली आहे. कोरडवाहू कापूस पिकात तण नियंत्रण, आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. तर मकाही जोमात आहे. या पिकांमध्ये खते, फवारण्या व आंतरमशागतीची कामे आठ-१० दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी उरकून घेतली होती. कोरडवाहू पिकांची अवस्था मुरमाड व हलक्‍या जमिनीत बिकट बनत चालली होती. चोपडा भागातही पावसाची प्रतीक्षा होती. काळ्या कसदार शेतात कापूस पिकाची निकोप वाढ होण्यासाठीदेखील पावसाची गरज होती. पावसाचा जोर कमी होता. रविवारी (ता. २५) मध्यरात्रीनंतर पावसाला सुरवात झाली. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ७२ टक्के, नंदुरबारमध्ये १५९ टक्के, तर धुळ्यातही सुमारे ६५ टक्के पाऊस झाल्याची माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात यावलमध्ये ८२ तर मुक्ताईनगरातही ८२ टक्‍क्‍यांवर पाऊस झाल्याची माहिती मिळाली. गेल्या २४ तासांतील पाऊस (सोमवारी सकाळपर्यंत, मिलिमीटरमध्ये ः जळगाव जिल्हा ः जळगाव आठ, भुसावळ सात, यावल सहा, चोपडा सात, जामनेर सहा. धुळे ः शिरपूर  पाच, साक्री सात.  धुळे, नंदुरबारातही हलक्या सरी धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतही तुरळक पाऊस झाला. साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com