चाळीसगावात मोसंबी विकण्यासाठी शेतकरी उतरला रस्त्यावर

चाळीसगाव, जि. जळगाव : बाजारात व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने स्वतः थेट ग्राहकांना मोसंबीची विक्री सुरू केली आहे. त्यातून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
Chalisgaon, a farmer took to the streets to sell citrus fruits
Chalisgaon, a farmer took to the streets to sell citrus fruits

चाळीसगाव, जि. जळगाव  : शेतात दिवसभर राबून मोठ्या कष्टाने मोसंबीचे पीक घेतले. उत्पादनही चांगले झाले. मात्र, बाजारात व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने स्वतः थेट ग्राहकांना मोसंबीची विक्री सुरू केली आहे. त्यातून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदी (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी मिलिंद गायकवाड यांची व त्यांच्या मामांची शेती आहे. सुमारे अडीच एकर क्षेत्रावर त्यांनी मोसंबीचे पीक घेतले. मोसंबीच्या रोपांची लागवड केल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली. झाडांना चांगल्या मोसंबीही लागल्या. मोसंबी बाजारात विकण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी टेम्पोमध्ये भरला. मात्र, येथील बाजारात या मोसंबीला अवघ्या पंधरा ते वीस रुपये किलोचा भाव मिळाला. मोसंबीची लागवड करण्यापासून उत्पादन हाती येईपर्यंत त्यावर झालेला खर्च आणि मिळणारा कमी भाव, यात मोठी तफावत आली. 

वास्तविक, बाजारात ग्राहकांना ५० ते ८० रुपये किलो दराने मोसंबी विक्री केली जात आहे. मात्र व्यापारी १५ ते २० रुपयांचा भाव देत होते. त्यामुळे शेतकरी गायकवाड यांनी आपली मोसंबी पिकअप व्हॅनमध्ये भरली आणि शहरातील स्टेशन रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशेजारी विक्री सुरू केली. ५० रुपये किलोप्रमाणे मोसंबीची विक्री सुरू केल्यानंतर ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

बाजारात व्यापारी कमी दराने शेतीमालाची खरेदी करून जादा दराने ग्राहकांना विकतात. शेतकऱ्यांनी अजून थोडे कष्ट घेऊन आपल्या उत्पादित माल थेट विक्री करावा. जेणेकरून होणारे नुकसान टाळता येईल. - मिलिंद गायकवाड, शेतकरी, शिंदी (ता. चाळीसगाव, जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com