कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्
ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-पाण्यासाठी वणवण
नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने मेंढपाळांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने चारा, पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. मालेगाव, येवला, निफाड, तालुक्यात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप मजल दरमजल करीत जिकडे चारा पाणी भेटेल तिकडे स्थलांतर करीत आहे.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना या भागात आलेल्या मेंढपाळांना अक्षरशः उपाशीपोटी फिरून मेंढ्यांसाठी चारा व पाण्यासाठी जुळवाजुळव करावी लागत आहे. कडक उन्हाळ्यात पोटाला चिमटा देऊन मेंढरे जतन करावी लागत आहे. चारापाण्याअभावी वाळलेला चारा, बाभळी व निंबाच्या पाल्यावर गुजराण करावी लागत आहे. परिणामी, जिल्ह्यातील मेंढपाळ चारा भेटेल त्या तालुक्यात शेळ्या मेंढ्यांना घेऊन दाखल झाले आहेत.
उदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकंती करून शेतात उघड्यावरच संसार टाकण्यासाठी मेंढपाळांना शेतकऱ्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत. ज्या शेतकऱ्यांची शेती खाली झाली आहे, अशा ठिकाणी जवळपास चाऱ्याची उपलब्धता व क्षेत्राचा अंदाज घेऊन मेंढपाळ बांधव मुक्काम करतात. पोटच्या मुलांपेक्षा मेंढ्यांची काळजी घेणाऱ्या मेंढपाळांना रणरणत्या उन्हातान्हात मेंढ्यांसाठी चाऱ्याची तजवीज करून ठेवावी लागत आहे.
दुपारी कडक ऊन, सायंकाळी वातावरणात निर्माण झालेला उकाडा अशातच त्यांचा दिवस जातो. अनेक जण पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करतात. सध्या मोजक्याच गावातील धनगर बांधवांकडे शेळ्या, मेंढ्या आहेत. शेकडो रिकाम्या हातांना उद्योग देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. मात्र दुर्लक्षित असलेल्या या व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही पाहिजे तशी खुली झालेली दिसत नाहीत. दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचा सामना मेंढपाळांना करावा लागतो आहे.