Agriculture news in marathi;In the eastern part of Sinnar taluka, water can be used | Agrowon

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पाण्यासाठी वणवण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट झाला आहे. टँकरची अनियमितता, अटलेल्या विहरी यामुळे पंचाळे, मीठसागरे, शिंदेवाडी, शहा, पांगरी, देवपूर, खोपडी, दातली भागात पाण्यासाठी वणवण करत भटकावे लागत आहे. 

उपलब्ध असलेले जलसाठे, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रयत्न होत असले तरी वास्तविक स्थितीत होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. गावातील लोकसंख्या व होणारा पाणीपुरवठा यांचे गणित जुळत नाही. येणारे पाणी गढूळ व दूषित असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट झाला आहे. टँकरची अनियमितता, अटलेल्या विहरी यामुळे पंचाळे, मीठसागरे, शिंदेवाडी, शहा, पांगरी, देवपूर, खोपडी, दातली भागात पाण्यासाठी वणवण करत भटकावे लागत आहे. 

उपलब्ध असलेले जलसाठे, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रयत्न होत असले तरी वास्तविक स्थितीत होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. गावातील लोकसंख्या व होणारा पाणीपुरवठा यांचे गणित जुळत नाही. येणारे पाणी गढूळ व दूषित असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टंचाईच्या झळा सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या पाण्यावर जनावरांसह माणसांची तहान भागवावी लागत आहे. पंचाळे येथे दहा हजार लिटर क्षमतेच्या शासकीय टँकरच्या पाच फेऱ्या होतात, तर निमा उद्योग संघटनेकडून जनावरांसाठी देवपूर, पंचाळे, मीठसागरे या गावांसाठी प्रत्येकी २२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुले पशुपालक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु गावापेक्षा वस्तीवाड्यांवर लोकसंख्या जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची झळ वस्तीवाड्यांवरील रहिवाशांना बसत आहे.

शासनाच्या वतीने वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही गावात टाक्या बसवण्यात आल्या नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण भटकावे लागत असल्याने हाल होत आहेत. काही शेतकऱ्यांच्या विहिरीत थोडे फार पाणी उपलब्ध आहे; मात्र, याच गढूळ व दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. अनेक जण हे पाणी उकळून नंतर गाळून वापरत असल्याने पाण्याचे मोठे दुर्भिक्ष तालुक्याच्या पूर्व भागात असून पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

सिन्नर तालुक्यातील सद्यःस्थिती

गावे-२३, वाड्या-२८२    एकूण - ३०५
एकूण टँकर    ६८
अधिग्रहित विहिरी     ४
मंजूर फेऱ्या     १७६
प्रत्यक्ष फेऱ्या    १५७

 

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...