परभणी जिल्ह्यात विम्याविना पावणेदोन लाख हेक्टर कपाशी

परभणी जिल्ह्यात विम्याविना पावणेदोन लाख हेक्टर कपाशी
परभणी जिल्ह्यात विम्याविना पावणेदोन लाख हेक्टर कपाशी

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या (२०१९) खरीप हंगामात २ लाख २ हजार ३१६ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ७० हजार ५७७ शेतकऱ्यांनी ३१ हजार ७८७ हेक्टरवरील कपाशीसाठी १३६ कोटी ६८ लाख ७३ हजार ५३९ रुपये एवढ्या रकमचे विमासंरक्षण घेतले. मात्र, १ लाख ७० हजार ५२९ हेक्टरवरील कपाशीसाठी शेतकऱ्यांनी विमासंरक्षण घेतलेले नाही. १३ हजार १२ हेक्टरवरील सोयाबीनचाही विमा उतरविलेला नाही. त्यामुळे अतिवृष्टी, पावसामुळे बाधित पिकांसाठी शेतकरी विमा नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे तूर, ज्वारी, बाजरी, भात, मूग, उडीद या पिकांच्या पेरणीक्षेत्रापेक्षा विमासंरक्षित क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे कमी दराने विमा परतावा मंजूर होईल. विमासंरक्षण घेतेलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८७० आहे. प्रत्यक्षात ५ लाख ३३ हजार ५३९ हेक्टरवर पेरणी झाली. ४ लाख ३० हजार ४३५ हेक्टरवरील पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमासंरक्षण घेतले. सोयाबीनची २ लाख ४० हजार ५२ हेक्टरवर पेरणी झाली. २ लाख २७ हजार ४० हेक्टरवरील सोयाबीनसाठी ९७६ कोटी २७ लाख २८ हजार ५८१ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. कपाशीचे १ लाख ७० हजार ५२९ हेक्टर आणि सोयाबीनचे १३ लाख १२ हेक्टर एवढ्या क्षेत्राला विमा कवच नाही. विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही.

मुगाचे पेरणी क्षेत्र २६ हजार ८७९ हेक्टर आहे. १ लाख ७८ हजार १३० शेतकऱ्यांनी ७५ हजार २३ हेक्टरवरील मुगासाठी म्हणजेच पेरणी क्षेत्रापेक्षा ४८ हजार १४४ हेक्टरने जास्त पिकासाठी विमासंरक्षण घेतले. उडदाची ७ हजार ४२१ हेक्टरवर पेरणी झाली. ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी २४ हजार ६२७ हेक्टरवरील म्हणजेच पेरणी क्षेत्रापेक्षा १७ हजार ४२१ हेक्टरने जास्त क्षेत्रासाठी विमासंरक्षण घेतले. तुरीची ४९ हजार ३५१ हेक्टरवर पेरणी झाली. १ लाख ४७ हजार ५१६ शेतकऱ्यांनी ५६ हजार ३४४ हेक्टरवरील तुरीसाठी विमासंरक्षण घेतले. 

ज्वारीची ५ हजार ६७३ हेक्टरवर पेरणी झाली. ३१ हजार २६४ शेतकऱ्यांनी १० हजार ७९१ हेक्टरवरील ज्वारीसाठी विमासंरक्षण घेतले. बाजरीची ५८५ हेक्टरवर पेरणी झाली. १० हजार १४१ शेतकऱ्यांनी ३ हजार ८०६ हेक्टरसाठी, तर भाताची ९ हेक्टरवर पेरणी झाली. त्यासाठी १ हजार ४६० शेतकऱ्यांनी ३९१ हेक्टरवरील भातासाठी विमासंरक्षण घेतले.

पीकनिहाय स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र विमासंरक्षित क्षेत्र शेतकरी संख्या
कापूस  २०२३१६   ३१७८७  ७०५७७
सोयाबीन २४००५२    २२७०४०  ३०७५०२
तूर  ४९३५१ ५६३४४ १४७५१६
मूग २६८७९ ७५०२३  १७८१३०
उडीद  ७४२१  २४६२७ ७२९९८
ज्वारी ५६७३ १०७९१ ३१२६४
बाजरी ५८५ ३८०६ १०१४१
भात   ३९१ १४६०
सूर्यफूल  ६२२  २०९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com