परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांचे पीक कर्जवाटप रखडले

परभणी ः राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्जवाटप अद्याप ४० टक्केच्या आत, तर खासगी बॅंकांचे २५ टक्केच्या आत रखडले आहे.
In Parbhani district, crop lending of nationalized, private banks stalled
In Parbhani district, crop lending of nationalized, private banks stalled

परभणी ः जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२१) खरीप हंगामात गुरुवार (ता.९) पर्यंत विविध बॅंकांनी ९६ हजार ९३६ शेतकऱ्यांना ६५२ कोटी २८ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ५३.७६ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेपाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने देखील उद्दिष्टपूर्ती केली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्जवाटप अद्याप ४० टक्केच्या आत, तर खासगी बॅंकांचे २५ टक्केच्या आत रखडले आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना ७८१  कोटी ५८ लाख रुपये, खासगी बॅंकांना १०१ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १८७ कोटी ६३ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १४२ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजवर २८ हजार ४८ शेतकऱ्यांना २७६ कोटी २२ लाख रुपये (३५.३४ टक्के), खासगी बॅंकांनी १ हजार ७५२  शेतकऱ्यांना २० कोटी ६० लाख रुपये (२०.३६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २३ हजार ६१५ शेतकऱ्यांना १९८ कोटी  ९१ लाख रुपये १०६.०१ टक्के), जिल्हा बॅंकेने ४३ हजार ५२१ शेतकऱ्यांना १०९.६१ टक्के पीक कर्जवाटप केले. 

सर्व बॅंकांनी मिळून २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना २३५  कोटी ४३ लाख रुपयांचे नवीन पीक कर्जवाटप केले आहे. एकूण ७२  हजार १७ शेतकऱ्यांनी ४१६ कोटी ८५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले असले, तरी एकाही नवीन शेतकऱ्यांस कर्ज दिलेले नाही. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सुट्टीच्या दिवशी कामकाज करत रविवार (ता.२२ ऑगस्ट) पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com