Agriculture news in Marathi,In Patan taluka in rice seeds sowing | Agrowon

पाटण तालुक्यात भातलागणीस वेग

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

पाटण, जि. सातारा ः तालुक्‍यात मॉन्सूनने २७ जूनपासून लावलेल्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. गेले बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात लागणीच्या कामास तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात वेग आला आहे. 

पाटण, जि. सातारा ः तालुक्‍यात मॉन्सूनने २७ जूनपासून लावलेल्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. गेले बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात लागणीच्या कामास तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात वेग आला आहे. 

संपूर्ण रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. १३ जूनच्या दरम्यान दोन दिवस पडलेल्या पावसाचा अपवाद वगळता २७ जूनपर्यंत मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळिराजा चिंतेत होता. २७ जून रोजी दमदार पावसाचे आगमन झाले व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तालुक्‍यात भातपिकाखालील सर्वसाधारण १६ हजार ४३० हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापैकी पेरणीचे दहा हजार ६६६ हेक्‍टर व लागणीचे सरासरी सहा हजार ८० हेक्‍टर क्षेत्र आहे. 

नाचणी पुनर्लागणीचे सर्वसाधारण क्षेत्र चार हजार ६५० हेक्‍टर आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसात टाकलेले नाचणी व भाताचे तरवे पुनर्लागणीस आले आहेत. पाऊस पडला नसता तर ते वाया जाण्याची भीती होती. मात्र, दोन आठवडे सुरू असलेल्या संततधार पावसाने भात व नाचणी लागणीस तो उपयुक्त आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात भात लागणीस सुरवात झाली आहे. 

डोंगरउतारावर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भात लागणीसाठी मजुरांची कमतरता असल्याने पैरा पद्धतीने एकमेकास शेतकरी मदत करताना पहावयास मिळत आहेत. कोयना, मोरणा, चाफळ, केरा, तारळे व ढेबेवाडी विभागाच्या पश्‍चिम भागातील प्रत्येक गावातील शिवारात भात व नाचणी लागणीची लगभग दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साह्याने तर काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने चिखल करण्याचे काम शेतकरी करताना पाहावयास मिळत आहेत.

जुलैअखेरपर्यंत भातलागणीची कामे चालतील असा अंदाज असून, पडत असलेला मुसळधार पाऊस भात व नाचणीच्या पुनर्लागणीस उपयुक्त असल्याने शेतकरी या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात...गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील...
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा...कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...