Agriculture news in marathi;In the six districts of Nagpur division, 122 9 agricultural laborers | Agrowon

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९ शेतीशाळा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या शेतीशाळांना नागपूर विभागात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. विभागातील सहा जिल्ह्यांत सुमारे १२२९ शेतीशाळा घेण्यात येत असून, त्याकरिता खास पीकनिहाय शेड्यूल तयार करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरदेखील चार शेतीशाळा घेण्यात येत आहेत. 

नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या शेतीशाळांना नागपूर विभागात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. विभागातील सहा जिल्ह्यांत सुमारे १२२९ शेतीशाळा घेण्यात येत असून, त्याकरिता खास पीकनिहाय शेड्यूल तयार करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरदेखील चार शेतीशाळा घेण्यात येत आहेत. 

कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शेतकरी तसेच कृषी विभागात संवाद वाढत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व्हावी त्यासोबतच पिकाच्या निरीक्षणाचा हेतूही साधला जावा याकरिता शेतीशाळांची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्यात या हंगामापासून शेतीशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांना शेतीशाळा सक्‍तीच्या आहेत. त्यानुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात १२२९ शेतीशाळा २५ मे पासून सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात वर्धा या एकमेव जिल्ह्याचा समावेश असल्याने या ठिकाणी अतिरिक्‍त १४० शेतीशाळा घेण्यात येत आहेत.

गडचिरोली व भात उत्पादक इतर दुर्गम जिल्ह्यात शेतीशाळांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढता आहे. सोयाबीन सहा, कापूस व भात आठ याप्रमाणे अभ्यासक्रमाचे शेड्यूल तयार आहे. वनामती येथे कृषी सहायक व पर्यवेक्षकांकरिता यापूर्वी प्रशिक्षण घेण्यात आले. शेतीशाळांमध्ये लागवड ते काढणी असे शेड्यूल असून त्यासोबतच विरंगुळा म्हणूनदेखील काही उपक्रम राबविले जातात. क्रॉपसॅपशी शेतीशाळा संलग्न असल्याने नियमित निरीक्षणाचा उद्देशही साधला जातो. 

अशा आहेत पीकनिहाय शेतीशाळा

कापूस  २३४
तूर व सोयाबीन  १८
भात  ६१८
कापूस व तूर १६
तूर 
सोयाबीन  १७४
मका 
भाजीपाला ३३
फळबाग १७
मसाला पीक
औषधी वनस्पती 
आधुनिक तंत्रज्ञान 

ज्या पिकाखालील ७० टक्‍के क्षेत्र त्या गावात असेल त्याच पिकाची शेतीशाळा घेतली जात आहे. शेतीमध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग असल्याने महिला शेतीशाळांवर जाणीवपूर्वक भर दिला गेला आहे. महिला कृषी सहायकांना महिला शेतीशाळा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
- रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर
 

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...