भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बाजारभाव बातम्या
सोलापुरात वांगी, गाजराला उठाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, घेवडा, काकडी, गाजराला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही काहीसे टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, घेवडा, काकडी, गाजराला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही काहीसे टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
गतसप्ताहात बाजार समितीच्या आवारात वांग्याची प्रतिदिन २० ते ४० क्विंटल, घेवड्याची २ ते ५ क्विंटल, काकडीची २० ते ३० क्विंटल आणि गाजराची १ ते २ क्विंटल अशी आवक राहिली. ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने चांगला उठाव मिळाला, परिणामी दरही टिकून राहिले.
वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, घेवड्याला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये आणि गाजराला किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, सिमला मिरचीचे दरही पुन्हा काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवक प्रत्येकी २० ते ५० क्विंटलपर्यंत रोज राहिली. त्यात हिरव्या मिरचीला किमान २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर सिमला मिरचीला किमान ५०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये असा दर मिळाला. भाज्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर पुन्हा स्थिर राहिले.
कांदा दरात किंचित सुधारणा
कांद्याच्या दरात या सप्ताहात काहीशी सुधारणा झाली. कांद्याची आवक रोज ८० ते १०० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याची आवक सर्वाधिक जिल्ह्यातून झाली. कांद्याला किमान २०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांच्या फरकाने दरात किंचित सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.
- 1 of 67
- ››