Agriculture news in marathi;In Vidharbha groundnut, the price of groundnut reached Rs 5700 per quintal | Agrowon

विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७०० रुपये क्‍विंटलवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक बाजार समित्यांमध्ये होत आहे. यवतमाळ, अमरावती, तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत सध्या भुईमुगाची आवक वाढती असून दरातही तेजी अनुभवली जात आहे. 

विदर्भात उन्हाळी भुईमूग क्षेत्र सर्वाधिक आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांकडून भुईमूग घेतला जातो. परंतू या वर्षी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर भुईमुगाची लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. लागवड क्षेत्र कमी झाल्याच्या परिणामी बाजारातील भुईमुगाची आवक ही अपेक्षित नाही. परिणामी, दरात तेजीचा अनुभव सध्या भुईमूग उत्पादक घेत आहेत. 

नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक बाजार समित्यांमध्ये होत आहे. यवतमाळ, अमरावती, तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत सध्या भुईमुगाची आवक वाढती असून दरातही तेजी अनुभवली जात आहे. 

विदर्भात उन्हाळी भुईमूग क्षेत्र सर्वाधिक आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांकडून भुईमूग घेतला जातो. परंतू या वर्षी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर भुईमुगाची लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. लागवड क्षेत्र कमी झाल्याच्या परिणामी बाजारातील भुईमुगाची आवक ही अपेक्षित नाही. परिणामी, दरात तेजीचा अनुभव सध्या भुईमूग उत्पादक घेत आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र सर्वाधिक आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सुमारे आठ हजार हेक्‍टरवर या जिल्ह्यात भुईमूग होतो. परंतु या वर्षी संरक्षित सिंचन पर्यायांनी तळ गाठल्याने त्याचा परिणाम भुईमूग क्षेत्र कमी होण्यावर झाला आहे. यवतमाळ बाजार समितीत सध्या रोजची भुईमूग आवक अवघी ७०० क्‍विंटलची आहे. भुईमुगाला सरासरी ५२०० ते ५७०० रुपये क्‍विंटल इतका दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव वाढई यांनी दिली. 

अमरावती बाजार समितीत देखील दर पाच हजार रुपये क्‍विंटलच्या वर असल्याचे सांगण्यात आले. परंतु आठवडाभरात दरात मोठे चढउतार या ठिकाणी अनुभवण्यात आले. गुरुवारी (ता. ६) ४०५० ते ५१५० इतका दर भुईमुगाचा होता. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (ता. ७) हे दर ४५०० ते ५१५० रुपयांवर पोचले. शनिवारी (ता. ८) ४५०० ते ५२०० रुपये क्‍विंटल इतका दर मिळाला. त्यानंतर मात्र अमरावती बाजार समितीत मंगळवारी (ता. ११)  दर ४००० ते ५२०० रुपयांवर पोचले. शुक्रवारी (ता. १४) ४५०० ते ५४३१ रुपये क्‍विंटलचा दर भुईमूग शेंगांना मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत देखील भुईमूग शेंगांची आवक वाढती राहते. वाशीम जिल्ह्यात ६०० हेक्‍टरचे सरासरी क्षेत्र आहे. या वर्षी पाण्याअभावी ते अर्ध्यावर आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. कारंजा बाजार समितीत भुईमुगाचे दर ५५०० रुपये क्‍विंटलचे आहेत. सरासरी ५०० क्‍विंटलची आवक या ठिकाणी असल्याचे कारंजा बाजार समितीचे सचिव नीलेश भाकरे यांनी सांगितले. 

सरासरी क्षेत्र व चौकटीत या वर्षीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

अमरावती  २२०० (९१४)
बुलडाणा १५०० (८७१)
अकोला  २९०० (८४७)
यवतमाळ  ८००० (१७४२)
वाशीम  ६०० (३००.९०)

 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...