पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
बातम्या
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक क्षेत्राचा विमा !
नांदेड ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ३ लाख ७० हजार ३७१ हेक्टर आहे. मात्र, ५ लाख ५९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत ४ लाख ११२ हजार ७७१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे. पेरणी क्षेत्रापेक्षा ४२ हजार ३९९ हेक्टरने विमा संरक्षित क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे पीकविमा परतावा मंजूर करताना क्षेत्र सुधार गुणांक लागू होऊन कमी दराने नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.
नांदेड ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ३ लाख ७० हजार ३७१ हेक्टर आहे. मात्र, ५ लाख ५९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत ४ लाख ११२ हजार ७७१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे. पेरणी क्षेत्रापेक्षा ४२ हजार ३९९ हेक्टरने विमा संरक्षित क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे पीकविमा परतावा मंजूर करताना क्षेत्र सुधार गुणांक लागू होऊन कमी दराने नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कपाशीचे १ लाख ९१ हजार १२० हेक्टर क्षेत्र विमासंरक्षणाविना आहे. सोयाबीन, मूग, उडीद, तीळ या चार पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमासंरक्षित क्षेत्र जास्त आहे. कापूस, तूर, ज्वारी, भात या चार पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमासंरक्षित क्षेत्र कमी आहे. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख ५८ हजार ४०५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यंदा विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ११ लाख ९८ हजार ५८ एवढे पीकविमा प्रस्ताव सादर केले. एकूण ५ लाख ८५ हजार ९९३ हेक्टरवरील पिकांसाठी विमासंरक्षण घेतले.
जिल्ह्याच्या एकूण पेरणी क्षेत्राशी तुलना केली असता १ लाख ७२ हजार ४१२ हेक्टरवरील पिकांना विमासंरक्षण नसल्याचे स्पष्ट होते. परंतु, पीकनिहाय पेरणीनिहाय पेरणी क्षेत्र आणि विमासंरक्षित क्षेत्र यांची तुलना केली असता विमासंरक्षित क्षेत्र आणि पेरणी क्षेत्रात तफावत येत आहे. सोयाबीनची ३ लाख ७० हजार ३७२ हेक्टरवर पेरणी झाली. तरीही शेतकऱ्यांनी ५ लाख ५९ हजार ३१३ विमा प्रस्ताव दाखल केले. कपाशीचे लागवड क्षेत्र २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर आहे. मात्र, शेतकऱ्यांनी १ लाख १ हजार ५२ विमा प्रस्ताव दाखल केले.
४० हजार ६९० हेक्टरवरील कपाशीसाठी विमासंरक्षण घेतले आहे. एकूण १ लाख ९१ हजार १२० हेक्टरवरील कपाशीला विमासंरक्षण नाही. तुरीची ७१ हजार १८८ हेक्टरवर पेरणी झाली, तर १८ हजार ६५७ हेक्टरवरील तुरीसाठी विमासंरक्षण घेतले गेले. तुरीच्या ५५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्राला विमासंरक्षण नाही. मुगाची २३ हजार २३९ हेक्टरवर पेरणी झाली, तर ४५ हजार ९३५ हेक्टरवरील मुगाचा विमा उतरवला गेला. मुगाच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमासंरक्षित क्षेत्र २२ हजार ७०० हेक्टरने जास्त आहे.
उडदाची २२ हजार ९८३ हेक्टरवर पेरणी झाली, तर ४३ हजार ६०२ हेक्टरचे विमासंरक्षण घेण्यात आले. याचेही पेरणी क्षेत्रापेक्षा विमासंरक्षित क्षेत्र २० हजार ६१९ हेक्टरने जास्त आहे. ज्वारीची ३५ हजार ६९९ हेक्टरवर पेरणी झाली. २२ हजार २६४ हेक्टरवरील ज्वारीचा विमा उतरविण्यात आला. ज्वारीचे १८ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र विम्याविना आहे. भाताची ९२१ हेक्टरवर पेरणी झाली, तर ३१२ हेक्टरवरील भाताचा विमा उतरविण्यात आला. तिळाची ३९६ हेक्टरवर पेरणी झाली. १ हजार ७१५ हेक्टरचे विमासंरक्षण घेतले गेले.
पीकनिहाय स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक | पेरणी क्षेत्र | विमासंरक्षित क्षेत्र |
सोयाबीन | ३७०३७२ | ४१२७७१ |
कापूस | २३१८१० | ४०६९० |
तूर | ७११८८ | १८६५७ |
मूग | २३२३९ | ४५९३९ |
उडीद | २२९८३ | ४३६०२ |
ज्वारी | ३५६९९ | २२२६४ |
भात | ९२१ | ३५२ |
तीळ | ३९६ | १७२५ |
- 1 of 913
- ››