agriculture news in Marathi,insurance or compensation will get farmer, Maharashtra | Agrowon

सांगली : डाळिंब नुकसानीचा विमा किंवा भरपाई मिळणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शासनाचा स्पष्ट अध्यादेश असून डाळिंब उत्पादक शेतकरी विमा किंवा नुकसान भरपाईपैकी एकालाच पात्र होतील.
- राहुल जितकर, कृषी अधिकारी

आटपाडी, जि. सांगली ः अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसह डाळिंबाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र नुकसानभरपाई किंवा विमा या पैकी एकच लाभ मिळण्याबाबत शासनाचे अध्यादेश आल्यामुळे एकाच नुकसानभरपाईसाठी शेतकरी पात्र होणार तर एकापासून वंचित राहणार आहेत. यामुळे सारेच संभ्रमात पडले आहेत. 

मृग बहरात डाळिंब हंगाम मोठ्या प्रमाणात शेतकरी धरतात. या बहुतांश बागांचा विमा उतरवलेला आहे. या बागांचे अतिपावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये कळी न निघणे, सेटिंग न होणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे क्षमतेच्या तुलनेत पन्नास टक्केही फळधारणा झाली नाही. त्यात ऑक्‍टोबरमध्ये पावसाने कहरच केला. त्यामुळे फळावरती डाग पडणे, काळी पडणे, कुजणे असे नुकसान झाले आहे. 

विमा उतरवल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना विमा मिळेल अशी आशा आहे. शासनानेही शेतकऱ्यांची ओरड सूरू झाल्यावर नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र या अध्यादेशात मेख मारली आहे. पंचनामे सरसकट करा मात्र शेतकरी विमा किंवा नुकसानभरपाई या एकालाच पात्र राहणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरल्यामुळे त्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना दोन्हीपैकी एकच लाभ मिळाले आहेत. यामुळे शेतकरी गोंधळात पडले असून, शासन शेतकऱ्यांना फसवत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. 

विमा खासगी कंपनीकडून मिळतो तर नुकसानभरपाई शासन देते. शासन विम्याचा नव्वद टक्के हप्ता रक्कम भरते या नावाखाली विमाधारकांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले जाणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
‘वसाका’ला उसाचे टिपरू तोडू देणार नाही,...नाशिक : ‘‘नाशिक जिल्ह्यातील कादवा व द्वारकाधीश या...
शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्या, '...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा...जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता....
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या...मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना...
रत्नागिरीत २० हजार टन भात खरेदीचे...रत्नागिरी  : यंदा जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा...सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `...अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना...
...त्याने आपल्या शेतातील भाजी दिली थेट...पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील...
रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ...रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात...
जळगाव : सोयाबीनची खरेदी शून्य; ज्वारी...जळगाव : जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय केंद्रातील...
नांदेड विभागात यंदा गाळपासाठी १६ साखर...नांदेड : यंदाच्या २०१९-२० च्या गाळप हंगामात...
सिद्धेश्वर धरणामध्ये ९२.५० टक्के...गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ...
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यातअकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले...
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...