Agriculture news in marathiInterest free loan up to Rs 3 lakh to farmers: Hasan Mushrif | Agrowon

शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. 

कोल्हापूर  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. पाच फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला मंजुरी घेतली जाणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा सहकारी (केडीसीसी) मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ई-लॉबीसह युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम व मोबाइल व्हॅन अनावरण व नूतन इमारत भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. 

 मुश्रीफ म्हणाले,  ‘‘कर्जमाफी रद्द झाल्यानंतर ज्या संस्थांकडून व्याज वसुली सुरू आहे, ती बंद केली जाणार आहे. तसेच, आकारलेले व्याज परत दिले जाणार आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून १८ ते २० कोटी रुपये कर भरतो. या वर्षीही नफा वाढल्यामुळे तेवढाच कर भरावा लागेल. कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा बॅंकेचा व्यवसाय कमी होईल, अशी भीती होती. पण डिसेंबरनंतर चांगले चित्र आहे. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देत होतो.

तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याज दराने देत होतो. शेतकऱ्यांना आता तीन लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी द्यावे, असा प्रस्ताव बोर्डासमोर आणला जाईल. पाच फेब्रुवारीला बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाईल. एक एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी दिले जाईल.’’

या वेळी, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. बी. माने, प्रशासकीय व्यवस्थापक जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले...
  पाच फेब्रुवारीच्या वार्षिक सभेत मंजुरी घेणार
  सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ 
  ई-लॉबी, युपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम, मोबाइल व्हॅन सुरू


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...