agriculture news in Marathi,International grapes Seminar from today , Maharashtra | Agrowon

आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासून

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

पुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी) केंद्राकडून आजपासून (ता. १५) दोन दिवस पुण्यात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय द्राक्ष शेतीची वाटचाल आणि नियोजन या विषयावर शास्त्रज्ञांकडून मंथन केले जाईल. 

पुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी) केंद्राकडून आजपासून (ता. १५) दोन दिवस पुण्यात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय द्राक्ष शेतीची वाटचाल आणि नियोजन या विषयावर शास्त्रज्ञांकडून मंथन केले जाईल. 

अमनोरा टाऊनशिपमधील अमनोरा क्लब हाउसमध्ये होत असलेल्या या चर्चासत्रात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फलोत्पादन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिनेशकुमार, अतिरिक्त महासंचालक डॉ. डब्ल्यू. एस. धिल्लन, उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, डॉ. एस. डी. शिखामणी, डॉ. मुखोपाध्याय, डॉ. सी. डी. मायी, पद्श्री डॉ. के. एल. चढ्ढा तसेच इतर देशविदेशातील १५० शास्त्रज्ञ सहभागी होत आहेत. 

भारतातून सध्या ७० देशांना निर्यात केली जाते. २०१७-१८ मध्ये २९५ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल करणारी ही निर्यात सतत वाढते आहे. मात्र, देशी बाजारासाठी दर्जेदार माल आणि विदेशी बाजारातील स्पर्धा अशा दोन्ही पातळ्यांवर व्यूहरचना करणे अत्यावश्यक असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. 

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात लागवड नियोजन, हवामान बदल, बागांचे आरोग्य, काढणीपश्चात तंत्र-प्रक्रिया आणि अन्न सुरक्षितता तसेच शास्त्रज्ञ व उद्योजक यांच्यातील समन्वय अशा विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...