पुण्यामध्ये जागतिक देशी गोवंश परिषद

देशी गोवंश
देशी गोवंश

पुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळले आहेत. केवळ दूध उत्पादनावर न थांबता जातीवंत दुधाळ गोवंश आपल्या गोठ्यात तयार करत आहेत. याचबरोबर देशी गाईचे दूध, तूप तसेच गोमूत्र आणि शेणाचा देखील विविध उत्पादनांच्यामध्ये वापर वाढला आहे. परदेशातील पशुतज्ज्ञ देखील भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत. लक्षात घेऊन जातीवंत देशी गोवंश संगोपन, संवर्धन आणि प्रसारासाठी कामधेनू सेवा प्रतिष्ठान या संस्थेने पुणे शहरातील बालेवाडी येथे २९,३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी जागतिक देशी गोवंश परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी यांनी दिली. याबाबत माहिती देताना रत्नपारखी म्हणाले की, परिषदेमध्ये भारतीय गोवंशाबाबत सविस्तर चर्चा आणि देश-विदेशातील पशूतज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर आहेत. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथारिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्धाटन होत आहे. परिषदेमध्ये देशी गोवंश सुधारणा, जातीवंत वळूच्या रेतमात्रांची निर्मिती आणि उत्पादनाचे तंत्र, परदेशातील वंश सुधारणेतील संशोधन याबाबत भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील,स्वीडन आणि कॅनडामधील पशूतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबरीने गोशाळेचे नियोजन, गाईंचे आरोग्य, आहार व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योगाची उभारणी, मानवी आरोग्यायाबाबतही विविध क्षेत्रातील तज्ज्ञ माहिती देणार आहेत.   पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त, कृषी आयुक्त देखील विभागाचे उपक्रम आणि धोरणांबाबत माहिती देणार आहेत. परिषदेमध्ये बाएफ, माफसू, गोविज्ञान संस्था, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभागातील तज्ज्ञदेखील विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाबाबत माहिती देताना कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे म्हणाले की, बालेवाडी येथील ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेजसमोरील मैदानात परिषद तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील तीस जातीवंत देशी गोवंश पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबरीने दूध, तूप, गोमूत्र अर्क, शेणापासून विविध उत्पादनांची निर्मिती, प्रक्रिया यंत्रे, जैविक खते, पशू उपचारासाठी औषधी याबाबत माहिती पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जातीवंत गोवंश सांभाळणारे पशूपालक देखील या परिषदेमध्ये आपले अनुभव मांडणार आहेत. या परिषदेसाठी बालेवाडी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले आहे.  ः  विजय ठुबे, ९९२२९६९९३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com