agriculture news in Marathi,International ingenious cattle conference in Pune, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुण्यामध्ये जागतिक देशी गोवंश परिषद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळले आहेत. केवळ दूध उत्पादनावर न थांबता जातीवंत दुधाळ गोवंश आपल्या गोठ्यात तयार करत आहेत. याचबरोबर देशी गाईचे दूध, तूप तसेच गोमूत्र आणि शेणाचा देखील विविध उत्पादनांच्यामध्ये वापर वाढला आहे. परदेशातील पशुतज्ज्ञ देखील भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत.

पुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळले आहेत. केवळ दूध उत्पादनावर न थांबता जातीवंत दुधाळ गोवंश आपल्या गोठ्यात तयार करत आहेत. याचबरोबर देशी गाईचे दूध, तूप तसेच गोमूत्र आणि शेणाचा देखील विविध उत्पादनांच्यामध्ये वापर वाढला आहे. परदेशातील पशुतज्ज्ञ देखील भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत. लक्षात घेऊन जातीवंत देशी गोवंश संगोपन, संवर्धन आणि प्रसारासाठी कामधेनू सेवा प्रतिष्ठान या संस्थेने पुणे शहरातील बालेवाडी येथे २९,३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी जागतिक देशी गोवंश परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी यांनी दिली.

याबाबत माहिती देताना रत्नपारखी म्हणाले की, परिषदेमध्ये भारतीय गोवंशाबाबत सविस्तर चर्चा आणि देश-विदेशातील पशूतज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर आहेत. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथारिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्धाटन होत आहे. परिषदेमध्ये देशी गोवंश सुधारणा, जातीवंत वळूच्या रेतमात्रांची निर्मिती आणि उत्पादनाचे तंत्र, परदेशातील वंश सुधारणेतील संशोधन याबाबत भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील,स्वीडन आणि कॅनडामधील पशूतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबरीने गोशाळेचे नियोजन, गाईंचे आरोग्य, आहार व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योगाची उभारणी, मानवी आरोग्यायाबाबतही विविध क्षेत्रातील तज्ज्ञ माहिती देणार आहेत.  

पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त, कृषी आयुक्त देखील विभागाचे उपक्रम आणि धोरणांबाबत माहिती देणार आहेत. परिषदेमध्ये बाएफ, माफसू, गोविज्ञान संस्था, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभागातील तज्ज्ञदेखील विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाबाबत माहिती देताना कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे म्हणाले की, बालेवाडी येथील ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेजसमोरील मैदानात परिषद तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील तीस जातीवंत देशी गोवंश पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबरीने दूध, तूप, गोमूत्र अर्क, शेणापासून विविध उत्पादनांची निर्मिती, प्रक्रिया यंत्रे, जैविक खते, पशू उपचारासाठी औषधी याबाबत माहिती पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जातीवंत गोवंश सांभाळणारे पशूपालक देखील या परिषदेमध्ये आपले अनुभव मांडणार आहेत. या परिषदेसाठी बालेवाडी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले आहे.
 ः  विजय ठुबे, ९९२२९६९९३९


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफीबाबत...सोलापूर ः एकापाठोपाठ एका नैसर्गिक आपत्तीने...
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...