Agriculture news in marathiInvited applications for Micro Food Upgradation Scheme | Agrowon

सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज मागविले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

वाशीम  जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, तेलवर्गीय पीक प्रक्रिया उद्योगांना यामुळे गती मिळणार  आहे.

वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, तेलवर्गीय पीक प्रक्रिया उद्योगांना यामुळे गती मिळणार असून, असंघटित क्षेत्रातील लाकडी तेलघाणा, सोयाबीन प्रकिया उद्योगांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपनी घेऊ शकणार आहेत. सोयाबीन प्रक्रिया उद्योग स्तरवृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. नवीन उद्योग असल्यास सोयाबीन प्रक्रियेसाठी तर जुना उद्योग असल्यास सोयाबीन, करडई लाकडी तेल घाणा, खाद्य पदार्थ यासाठी लाभ घेता येईल.

यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासिंग सर्टिफिकेट, राहत्या घराचे वीजबिल, बँक पासबुक मागील सहा महिन्यांची छायांकित प्रत, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उतारा, भाडे करारपत्र, मशिनरी कोटेशन, नवीन बांधकाम करणार असल्यास सात-बारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

बचत गटासाठी बचतगट स्थापनेवेळीचा ठराव, बँक पासबुक छायांकित प्रत, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, कोटेशन, जागेचा भाडेकरार, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उतारा, मशिनरी कोटेशन, कर्ज काढण्यासाठीचा गटाचा ठराव, नवीन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

वैयक्तिक लाभासाठी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शेतकरी कंपनी, बचतगटांची तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
 


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...