सिंचन प्रकल्पांना मिळेल गती ः बावनकुळे

सिंचन प्रकल्पांना मिळेल गती ः बावनकुळे
सिंचन प्रकल्पांना मिळेल गती ः बावनकुळे

नागपूर ः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे जलद गतीने होण्यास मुख्य अभियंता कार्यालय महत्त्वाकांक्षी ठरेल, असा विश्‍वास ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्‍त केला.

मृद्‌ व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंजनी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अप्पर आयुक्‍त तसेच मुख्य अभियंता मृद व जलसंधारण, प्रादेशिक क्षेत्र पुणे-नागपूर सु. पा. कुशिरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी र. रा. बानुबाकडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सु. शि. सोळंके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘जलसंधारणाची कामे सूक्ष्म व सर्वदूर विखुरलेली असतात. विदर्भात जलसंधारणासंदर्भातील कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी या नवीन कार्यालयाचा नक्‍की उपयोग होणार आहे. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय राखून जलसंधारणाची कामे दर्जेदार करावीत. जिल्ह्यात ढोरापोरा नाला तसेच सुरसांड नदीवर दहा साखळी बंधारे तसेच नाग नदीच्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असून, नागपूर जिल्ह्यात नाला जोड प्रकल्पावर विशेष भर देण्यात येत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कापूस हे नगदी पीक असून पूर्व विदर्भात धान हे मुख्य पीक आहे. ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी मुख्य आधार आहे. विदर्भातील कोरडवाहू शेती फायद्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी नागपूर येथे मुख्य अभियंता कार्यालय सुरू करण्यात आले. यानंतर उपलब्ध निधीतून अमरावती व नागपूर मंडळांनी सिंचन विकासाची कामे केली,’’ असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com