जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची अल्प आवक

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची अल्प आवक
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची अल्प आवक

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरवड्यापासून धान्याची शेतकऱ्यांकडून किरकोळ आवक होत आहे. त्यात फक्त ज्वारीचे किरकोळ व्यवहार झाले आहेत. लिलाव जवळपास बंद आहेत. फक्त राजस्थान व मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांकडून बाजरी, चंदोसी, वनफोरसेव्हन गव्हाची पाठवणूक सुरू आहे.  व्यवहार अतिशय कमी असल्याने वित्तीय उलाढालही बाजारात घटली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने बाहेरील राज्यांतून होणारी पाठवणूकही कमी झाली आहे.  ज्वारीचे व्यवहारही या महिन्याच्या मध्यात झाले. नंतर फारसे व्यवहार झाले नाहीत. धान्याची आवक जवळपास ठप्प असल्याने हमाल, माथाडी मंडळीलाही हातावर हात धरून बसून राहावे लागत आहे. मध्य प्रदेशातून गव्हाची, तर राजस्थानमधून बाजरीची पाठवणूक तेथील मोठे व्यापारी करीत आहेत. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार सुरू आहेत. आवक घटलेली असली तरी ज्वारी, बाजरी, मका, गहू यांचे दर फारसे वाढलेले नाहीत. आवक नसल्याने दरही रोज जाहीर होत नसल्याचे सांगण्यात आले. लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये, बाजरीला २१००, ज्वारीला १९०० तर मक्‍यासही कमाल २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. पुढेही फारशी आवक बाजारात वाढणार नाही. कारण, शेतकऱ्यांनी जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे साठविलेल्या धान्याची विक्री बाजारात केली आहे. काही शेतकऱ्यांनी ज्वारी, मका व गव्हाची साठवणूक केली आहे. परंतु, ती फारशी नाही. यामुळे आवक वाढेल, असे कुठलेही चित्र नाही. नवीन हंगामासंबंधी तूर्त चित्र बरे आहे. मूग, उडीद व तीळ यांची आवक सप्टेंबरमध्ये सुरू होईल. तोपर्यंत बाजारातील उलाढाल वाढणार नाही, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com