Agriculture news in marathi;Jalgaon Agricultural Income Market Committee Grain short arrival | Agrowon

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची अल्प आवक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरवड्यापासून धान्याची शेतकऱ्यांकडून किरकोळ आवक होत आहे. त्यात फक्त ज्वारीचे किरकोळ व्यवहार झाले आहेत. लिलाव जवळपास बंद आहेत. फक्त राजस्थान व मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांकडून बाजरी, चंदोसी, वनफोरसेव्हन गव्हाची पाठवणूक सुरू आहे. 

व्यवहार अतिशय कमी असल्याने वित्तीय उलाढालही बाजारात घटली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने बाहेरील राज्यांतून होणारी पाठवणूकही कमी झाली आहे. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरवड्यापासून धान्याची शेतकऱ्यांकडून किरकोळ आवक होत आहे. त्यात फक्त ज्वारीचे किरकोळ व्यवहार झाले आहेत. लिलाव जवळपास बंद आहेत. फक्त राजस्थान व मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांकडून बाजरी, चंदोसी, वनफोरसेव्हन गव्हाची पाठवणूक सुरू आहे. 

व्यवहार अतिशय कमी असल्याने वित्तीय उलाढालही बाजारात घटली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने बाहेरील राज्यांतून होणारी पाठवणूकही कमी झाली आहे. 

ज्वारीचे व्यवहारही या महिन्याच्या मध्यात झाले. नंतर फारसे व्यवहार झाले नाहीत. धान्याची आवक जवळपास ठप्प असल्याने हमाल, माथाडी मंडळीलाही हातावर हात धरून बसून राहावे लागत आहे. मध्य प्रदेशातून गव्हाची, तर राजस्थानमधून बाजरीची पाठवणूक तेथील मोठे व्यापारी करीत आहेत. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार सुरू आहेत. आवक घटलेली असली तरी ज्वारी, बाजरी, मका, गहू यांचे दर फारसे वाढलेले नाहीत. आवक नसल्याने दरही रोज जाहीर होत नसल्याचे सांगण्यात आले.

लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये, बाजरीला २१००, ज्वारीला १९०० तर मक्‍यासही कमाल २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. पुढेही फारशी आवक बाजारात वाढणार नाही. कारण, शेतकऱ्यांनी जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे साठविलेल्या धान्याची विक्री बाजारात केली आहे. काही शेतकऱ्यांनी ज्वारी, मका व गव्हाची साठवणूक केली आहे. परंतु, ती फारशी नाही. यामुळे आवक वाढेल, असे कुठलेही चित्र नाही.

नवीन हंगामासंबंधी तूर्त चित्र बरे आहे. मूग, उडीद व तीळ यांची आवक सप्टेंबरमध्ये सुरू होईल. तोपर्यंत बाजारातील उलाढाल वाढणार नाही, असे सांगण्यात आले. 

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...