जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन कोटींचा नफा

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन कोटींचा नफा
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन कोटींचा नफा

जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला यंदा तीन कोटी अकरा लाख रुपये नफा झालेला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. संघातर्फे प्रतिदिन तीन लाख २७ हजार लिटर दूध संकलन करण्यात येत असून, ४९४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच हजार लिटर दूध भुकटी पावडर व जनावरांसाठी पशुखाद्यही पाठविण्यात येईल, असा निर्णय संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.    संघाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे या अध्यक्षस्थानी होत्या. आमदार एकनाथ खडसे, किशोर पाटील, सुरेश भोळे, माजी खासदार वसंतराव मोरे आदी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते. या वेळी अध्यक्षा खडसे म्हणाल्या, की ‘‘चाळीसगाव येथे नवीन शीतकरण केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पावडर गुदाम, बटर गुदाम इत्यादींसाठी शंभर टक्के अनुदानाचा पंधरा कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ६० पैसे भाव फरक व ग्रुप दूध उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २० पैसे भाव फरक अदा करण्याचा निर्णय झाला आहे.’’  जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक संजीव गौतम यांनी प्रास्ताविक केले. जळगाव (प्रतिनिधी) ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला यंदा तीन कोटी अकरा लाख रुपये नफा झालेला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. संघातर्फे प्रतिदिन तीन लाख २७ हजार लिटर दूध संकलन करण्यात येत असून, ४९४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच हजार लिटर दूध भुकटी पावडर व जनावरांसाठी पशुखाद्यही पाठविण्यात येईल, असा निर्णय संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.    संघाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे या अध्यक्षस्थानी होत्या. आमदार एकनाथ खडसे, किशोर पाटील, सुरेश भोळे, माजी खासदार वसंतराव मोरे आदी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते. या वेळी अध्यक्षा खडसे म्हणाल्या, की ‘‘चाळीसगाव येथे नवीन शीतकरण केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पावडर गुदाम, बटर गुदाम इत्यादींसाठी शंभर टक्के अनुदानाचा पंधरा कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ६० पैसे भाव फरक व ग्रुप दूध उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २० पैसे भाव फरक अदा करण्याचा निर्णय झाला आहे.’’  जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक संजीव गौतम यांनी प्रास्ताविक केले.  अमळनेर दूध संघाला मंजुरी देण्यात येऊ नये  अमळनेर येथे दूध संघ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. हा संघ सुरू करण्यासाठी दूध संघाची नाहरकत परवानगी घेतलेली नाही. तसेच, सभासदांना दुहेरी सभासद होता येत नाही. चाळीसगाव येथील दूध संघही मागे असाच अडचणीत आला होता. त्या वेळी तो जिल्हा दूध संघात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे अमळनेर येथील दूध संघ सुरू करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com