Agriculture news in marathi;Jalgaon District Co-operative Milk Union receives a profit of Rs 3 crore | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन कोटींचा नफा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला यंदा तीन कोटी अकरा लाख रुपये नफा झालेला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. संघातर्फे प्रतिदिन तीन लाख २७ हजार लिटर दूध संकलन करण्यात येत असून, ४९४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच हजार लिटर दूध भुकटी पावडर व जनावरांसाठी पशुखाद्यही पाठविण्यात येईल, असा निर्णय संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  

जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला यंदा तीन कोटी अकरा लाख रुपये नफा झालेला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. संघातर्फे प्रतिदिन तीन लाख २७ हजार लिटर दूध संकलन करण्यात येत असून, ४९४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच हजार लिटर दूध भुकटी पावडर व जनावरांसाठी पशुखाद्यही पाठविण्यात येईल, असा निर्णय संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  

 संघाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे या अध्यक्षस्थानी होत्या. आमदार एकनाथ खडसे, किशोर पाटील, सुरेश भोळे, माजी खासदार वसंतराव मोरे आदी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते. या वेळी अध्यक्षा खडसे म्हणाल्या, की ‘‘चाळीसगाव येथे नवीन शीतकरण केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पावडर गुदाम, बटर गुदाम इत्यादींसाठी शंभर टक्के अनुदानाचा पंधरा कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ६० पैसे भाव फरक व ग्रुप दूध उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २० पैसे भाव फरक अदा करण्याचा निर्णय झाला आहे.’’ 

जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक संजीव गौतम यांनी प्रास्ताविक केले. जळगाव (प्रतिनिधी) ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला यंदा तीन कोटी अकरा लाख रुपये नफा झालेला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. संघातर्फे प्रतिदिन तीन लाख २७ हजार लिटर दूध संकलन करण्यात येत असून, ४९४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच हजार लिटर दूध भुकटी पावडर व जनावरांसाठी पशुखाद्यही पाठविण्यात येईल, असा निर्णय संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  

 संघाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे या अध्यक्षस्थानी होत्या. आमदार एकनाथ खडसे, किशोर पाटील, सुरेश भोळे, माजी खासदार वसंतराव मोरे आदी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते. या वेळी अध्यक्षा खडसे म्हणाल्या, की ‘‘चाळीसगाव येथे नवीन शीतकरण केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पावडर गुदाम, बटर गुदाम इत्यादींसाठी शंभर टक्के अनुदानाचा पंधरा कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ६० पैसे भाव फरक व ग्रुप दूध उत्पादकांना गाय व म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २० पैसे भाव फरक अदा करण्याचा निर्णय झाला आहे.’’  जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक संजीव गौतम यांनी प्रास्ताविक केले. 

अमळनेर दूध संघाला मंजुरी देण्यात येऊ नये 
अमळनेर येथे दूध संघ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. हा संघ सुरू करण्यासाठी दूध संघाची नाहरकत परवानगी घेतलेली नाही. तसेच, सभासदांना दुहेरी सभासद होता येत नाही. चाळीसगाव येथील दूध संघही मागे असाच अडचणीत आला होता. त्या वेळी तो जिल्हा दूध संघात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे अमळनेर येथील दूध संघ सुरू करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

इतर ताज्या घडामोडी
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...
कांदा दरात घसरणीने शेतकऱ्यांत तीव्र...नाशिक : गेल्या आठवड्यात कांदा बाजारात ४५०...
...तर देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र...नाशिक : मोदी सरकार प्रादेशिक व्यापक आर्थिक...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कृषी आयुक्तांनी केली पीक कापणी...नगर  ः हमीदपूर (ता. नगर) येथे सुरू असलेल्या...
सोयाबीनची आवक सुरूनागपूर : बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक...