दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना कर्नाटकच्या झोनबंदीचा फटका शक्‍य

महापुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी चांगला दर मिळेल तेथे ऊसपुरवठा केला पाहिजे. मात्र, परराज्यांत ऊसबंदी चुकीची आहे. यातून आपल्याच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, हे आधी कर्नाटक सरकारने लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी बंदी मोडून हव्या त्या कारखान्यांना ऊस पुरवठा करावा. शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत झोनबंदीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवू - राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
उसाला झोनबंदी
उसाला झोनबंदी

कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून महाराष्ट्रात येणाऱ्या ऊस थांबणार आहे. अगोदरच महापुरामुळे उसाचे नुकसान झालेले असताना आता कर्नाटकातील ऊसही येणे शक्‍य नसल्याने दक्षिण महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेवरचे कारखाने हवालदिल झाले आहेत.  कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड, मिरज, जतसह अन्य तालुक्‍यांतील साखर कारखान्यांना फटका बसणार आहे. कर्नाटकातील कारखान्यांपेक्षा महाराष्ट्रातील साखर कारखाने उसाला अधिक भाव देतात. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा फटका कर्नाटकातील शेतकऱ्यांनाच बसणार आहे. सीमाभागातील शेतकऱ्यांचा कल महाराष्ट्रातील कारखान्यांकडे आहे. कर्नाटकातील उसावर महाराष्ट्रातील कारखान्यांना गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सोपे होते. मात्र, ऊसबंदीमुळे कर्नाटकातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील कारखान्यांपुढे नुकसानीचे संकट ओढावले आहे. बहुराज्य परवाना असलेले अनेक मातब्बर कारखाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आहेत. या कारखान्यांना कर्नाटक सीमाभागातील कर्नाटक हद्दीतील ऊस हंगामासाठी महत्वाचा ठरतो. जर महाराष्ट्रात आंदोलनामुळे हंगाम रखडत असला तर हे कारखाने कर्नाटकातून ऊस आणून हंगाम सुरळीत करतात. कर्नाटकातील कारखान्यापेक्षा महाराष्ट्रात दर चांगला मिळत असल्याने कर्नाटकातील शेतकऱ्यांना कलही महाराष्ट्रातील कारखान्यांकडे असतो. परंतू ऊसाची कमतरता असल्याने कर्नाटक शासनाने कारखानदांबरोबर झालेल्या बैठकीत झोनबंदी केली. यामुळे कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात येवू शकणार नाही. परिणामी याचा दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना बसू शकतो यामुळे या भागातील कारखान्यांत अस्वसथता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com