अकोला जिल्ह्यात ५८ टक्क्यांवर खरिपाचा पेरा

अकोला जिल्ह्यात ५८ टक्क्यांवर खरिपाचा पेरा
अकोला जिल्ह्यात ५८ टक्क्यांवर खरिपाचा पेरा

अकोला ः जिल्ह्यात या हंगामात जुलैच्या मध्यापर्यंतही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस न झाल्याने संपूर्ण क्षेत्रावर खरीप पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. पेरण्यांचा कालावधी लांबल्याने कृषी विभागाने केलेले नियोजन विस्कळित होईल, की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. जिल्ह्यात बुधवार (ता. १०)अखेरीस सरासरीच्या ५८ टक्के क्षेत्रावर म्हणजेच २ लाख ७९ हजार ८०४ हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्ह्याचे नियोजन खरीप क्षेत्र ४ लाख ८० हजार हेक्टर एवढे आहे. या हंगामात जिल्ह्यात तेल्हारा व बाळापूर या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता एकाही तालुक्यात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडलेला नाही. या अनियमित पावसाचा फटका पेरणीला बसला आहे. जिल्ह्यात आजवर लागवड झालेल्या क्षेत्रापैकी सोयाबीन १ लाख १३ हजार २८२ हेक्टरवर तर कापूस १ लाख २ हजार ८७३ हेक्टरवर लागवड झाली. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर तुरीची ३४ हजार ५७२ हेक्टरवर पेरणी झाली. दरम्यान, मूग, उडदाची पेरणी कमी झाली आहे. पाऊस असाच लांबल्यास कडधान्य वर्गीय पिकांच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यात प्रामुख्याने मूर्तिजापूर तालुक्यात समाधनकारक पाऊस न झाल्याने तेथे पेरण्यासुद्धा रखडल्या आहेत. येथे केवळ ९०.८ मिलिमीटर पाऊस पडला असून, तो सरासरीच्या अवघा ३९ टक्के आहे. गेल्या हंगामात तेल्हारा, अकोट या दोन तालुक्यांत पावसाची बिकट स्थिती झाली होती. यंदा हे दोन्ही तालुके पावसामध्ये आघाडीवर असून, तेथे पेरणीसुद्धा वेगाने सुरू आहे.  पेरणी लांबली मागील काही वर्षांत जूनमध्ये होणारी पेरणी जुलै संपेपर्यंत सुरू असून, याही वर्षात हाच पायंडा कायम आहे. मात्र, लांबलेल्या पेरणीमुळे शेतकऱ्यांना काही पिकांच्या लागवडीचा पुनर्विचार करावा लागत आहे. आत्तापर्यंतची लागवड पाहिल्यास सोयाबीन ही नियोजित १ लाख ६५ हजार हेक्टरच्या तुलनेत १ लाख १३ लाख हेक्टरवर झाली आहे. लांबलेल्या पेरण्यांमुळे मूग, उडदाचेही क्षेत्र लागवडीखाली येईल की नाही, याबाबत साशंकता आहे.    बुधवार (ता. १०) अखेरीस झालेला पाऊस : अकोला १३७.७ मिलिमीटर (६३.५६ टक्के), बार्शीटाकळी १५८ (७५.२), अकोट १७२ (८८.४३), तेल्हारा २०१.५ (१०६), बाळापूर २०५.३ (१०१), पातूर १९८ (८५.४२), मूर्तिजापूर ९०.८ ( ३९.४६). तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) आणि टक्केवारी 

तालूका     पेरणी क्षेत्र टक्केवारी
अकोला ६३७८९ ६० 
बार्शीटाकळी ३६८६० ५८
मूर्तिजापूर १३५८९ १८
अकोट     ५७५५० ८४
तेल्हारा     ६३१८८ ६६ 
बाळापूर ३०३८७ ५१
पातूर ४०४४० ७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com