agriculture news in Marathi,ladies finger export form farmers group , Maharashtra | Page 3 ||| Agrowon

शेतकरी गटाच्या माध्यमातून कोल्हापुरातून भेंडी निर्यात

राजकुमार चौगुले
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

ऊस व केळी या पिकाव्यरिक्त विषमुक्त भाजीपाला पिकविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. भेंडी लागवडीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता पंधरा एकरावर भेंडी पीक काढणीस तयार झाले आहे. येथून पुढे दररोज दीड टन भेंडी निर्यातीसाठी जातील असे नियोजन आम्ही केले आहे. शेतकऱ्यांना उस व केळीच्या व्यतिरिक्त भेंडीच्या रूपाने एक नवा पर्याय निर्माण झाला आहे. आता इतर गावांतील शेतकरीही आमच्या या प्रयत्नात सहभागी होत आहेत. 
- निंबराज नाईक निंबाळकर, अध्यक्ष, अन्नदाता नैसर्गिक शेतकरी उत्पादक मंडळ, नेज, जि. कोल्हापूर 

कोल्हापूर: शेतकरी गटाच्या माध्यमातून भेंडी निर्यात करण्याचा यशस्वी प्रयोग नेज (ता. हातकणंगले) येथील अन्नदाता नैसर्गिक शेतकरी उत्पादक मंडळाने केला आहे. गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच युरोपला भेंडी निर्यात होत आहेत. भेंडीबरोबरच पुढील काही महिन्यांत मिरचीची निर्यातही सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. गेल्या सप्ताहात तीन टन भेंडीची निर्यात झालेली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील शेती महापूर व अतिवृष्टीने झोकाळून गेली आहे. प्रचंड नुकसानीच्या सावटाखाली असणाऱ्या शेतकऱ्यांना भेंडी निर्यातीचे प्रयत्न दिशादर्शक ठरणार आहेत. या गटाला सर्व्हीस प्रोव्हायडर म्हणून रेसिफ्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीने सहकार्य केल्याने या प्रक्रियेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. 

नेज (ता. हातकणंगले) येथे अन्नदाता गट कार्यरत आहे. या गटातील सुमारे पंधरा शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्री (विषमुक्त) भेंडीसाठी मे महिन्यांपासूनच लागवड सुरू केली. अत्यंत नाममात्र प्रमाणात रासायनिक खते वापरून जास्त जास्त प्रमाणात जैविक पद्धतीने भेंडीचे व्यवस्थापन केले. आता भेंडी काढणीस तयार झाली आहेत. रेसिफ्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सेवेतून मुंबईच्या कंपनीमार्फत ही निर्यात सुरू होईल.

येत्या काही दिवसांत चिपरी (ता. शिरोळ) येथून हिरवी मिरचीची निर्यात करण्यात येणार आहे. सातत्याने पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना भेंडी पिकाच्या निर्यातीतून चांगले उत्पादन मिळविण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी गटातील शेतकऱ्यांकडून समाधानकारक दरात भेंडीची खरेदी करत आहे. यामुळे उत्पादकांना ठोस दर मिळणे शक्‍य झाले आहे. 

प्रतिक्रिया
आमच्या शेतकरी कंपनीमार्फत आम्ही बियाणे व अन्य जैविक निविष्ठा उपलब्ध करून दिल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात एकसारखेपणा आला. कंपनीच्या वतीने हिरवी मिरचीही निर्यात करणार आहोत. शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा याची दक्षता आम्ही घेत आहोत.
- बाळासाहेब माळी, संचालक, रेसिफ्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

अन्नदाता मंडळाचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे. आम्ही स्थापन केलेल्या गटांनी असे प्रयोग करावेत, यासाठी नजीकच्या काळात निर्यातीबाबतची चर्चासत्रे आम्ही आयोजित करणार आहोत. कोणत्या पिकाला कोणत्या देशात वाव आहे. हे समजल्यास गटांना असे प्रयोग करणे शक्‍य होईल
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर


इतर अॅग्रो विशेष
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....
मोसंबी कलमांची दुप्पट विक्री औरंगाबाद : पाण्याच्या उपलब्धतेबाबत सुखद...
केळीसाठी पीक विम्याचे निकष पूर्ववत...जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
शेतकरी नियोजन- कपाशीच्या पिकाला खत...सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...