नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली वाहून

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी, भीमा तसेच अन्य नद्यांना आलेल्या पुराचा चार तालुक्यांतील शंभर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, कोपरगाव या चार तालुक्यांतील १०० शेतकऱ्यांची सुमारे ४३.२० हेक्टर जमीन वाहून गेली असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. याशिवाय ८ तालुक्यांतील २६ हजार ४११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा ४७ हजार ५९२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

जिल्ह्यातील अकोले तालुका वगळला तर अजूनही अन्य तालुक्यांमध्ये पुरेसा व जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंता कायम आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांच्या काळात पुणे, नाशिक व अकोले भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा, गोदावरी, प्रवरा या नद्यांना पूर आला. त्याचा फटका नगरमधील नदीकाठच्या गावांना बसला होता. पुराच्या जोरदार पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील १६ शेतकऱ्यांची १०, संगमनेरमधील ७ शेतकऱ्यांची १.२०, अकोल्यातील ६० शेतकऱ्यांची २०, कोपरगावमधील २४ शेतकऱ्यांची १२ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. 

याशिवाय पुराच्या पाण्यामुळे ८ तालुक्यांतील २६ हजार ४११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा ४७ हजार ५९२ शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. पिकाचे पंचनामे केले असल्याचे सांगितले जात असले तरी वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे केले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिरायती क्षेत्रावरील ३३ हजार ६९९ शेतकऱ्यांच्या १६ हजार ९३९ हेक्टर, बागायती क्षेत्रावरील १३ हजार २१६ शेतकऱ्यांच्या १० हजार २१६ हेक्टर क्षेत्रावरील तर ४२८ शेतकऱ्यांचे २५५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसानक्षेत्र (हेक्टर)
तालुका नुकसानक्षेत्र शेतकरी
कर्जत  १४८२ २३८०
श्रीगोंदा  १०७६ ११८०
श्रीरामपूर १५९० १७१८
नेवासा १८९४ २६१२
संगमनेर  ४४० १०३३
अकोले  १९,९५९ ३६,२४६
कोपरगाव १२४३ २००७
राहाता  ५५० ४१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com