देशाला फसवणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर काढा ः सीताराम येचुरी

नाशिक येथील सभेत बोलताना सीताराम येचुरी
नाशिक येथील सभेत बोलताना सीताराम येचुरी

नाशिक  : फक्त राज्यातच नाही, तर देशात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले असून शेतकरी हैराण झाला आहे. तरुणाईला रोजगार नाही, देशात कुठेही विकास दिसत नाही. यावर पर्याय म्हणजे लाल सलाम आहे. देशाला फसविणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर काढा, असे प्रतिपादन माकपचे राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.

दिंडोरी लोकसभेसाठी माकप उमेदवार कॉ. जिवा पांडू गावित यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते शांताराम जाधव होते. तर भाकपाचे राजू देसले, के. एन. अहिरे, माजी आमदार नितीन भोसले, कामगार नेते डॉ.डी. एल.कराड आदी उपस्थित होते.

यावेळी जिवा पांडू गावित म्हणाले, की आत्ताच्या उमेदवारांना फक्त सत्तेशी घेणं देणं आहे. पक्ष, विचार, निष्ठा तसेच जबाबदारीशी काही देणेघेणे नाही. अडचणीच्या काळात भाजप वाढविणाऱ्या लोकांना घरी बसविले आहे. भाजपच्या वाईट दिवसात पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या व पक्षाला ओळख मिळवून देणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर अन्याय केला आहे. अन ज्यांचा त्यांनी पराभव केला अशा डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्याबाबत गावित यांनी टोला लगावला. 

‘राष्ट्रवादीने लाल सलमाला साथ द्यायला हवी होती.’ राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीने शिवसेनेतून उमेदवार आयात करण्याऐवजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला पाठिंबा द्यायला हवा होता. आमचाही उद्देश भाजपाला सत्तेपासून दूर करणे आहे, अशी अपेक्षा सीताराम येचुरी यांनी बोलून दाखविली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com