जळगावातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प साठा

जळगावातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प साठा
जळगावातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प साठा

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये अजूनही हवा तसा जलसाठा वाढलेला नाही. गिरणा धरणात सध्या फक्त सात टक्के जलसाठा आहे. तर वाघूर, लघू प्रकल्पांमधील मन्याड, बहुळा आदी प्रकल्पही कोरडे आहेत.  मध्यंतरी गिरणा धरणाचा साठा ५७ टक्के झाल्याची बातमी गिरणा पट्ट्यात सोशल मीडियावर फिरत होती. पण आत्तापर्यंत गिरणाच्या साठ्यात एक टक्काही वाढ झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी सांगितले.  गिरणा धरणाची  २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी साठवण क्षमता आहे. धरणात सात टक्के जिवंत जलसाठा वगळून तीन हजार दशलक्ष घनफूट एवढा मृतसाठा आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्प मात्र मागील आठवडाभराच्या पावसाने सुमारे १७ टक्के भरला आहे. परंतु पश्‍चिम भागातील बहुळा, मन्याड, भोकरबारी, अंजनी, बोरी हे प्रकल्प कोरडेच आहेत. रावेरमधील सुकी, अभोरा व मंगरूळ या मध्यम प्रकल्पांसह गारबर्डी लघू प्रकल्प, यावलमधील मोर प्रकल्प, चोपड्यातील गूळ व अनेर प्रकल्पाचा जलसाठा मात्र काहीसा वाढल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी आहे. या प्रकल्पांमध्ये ११८.७९ दलघमी म्हणजेच ४.१९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.६८ टीएमसी, गिरणा १.३७ टीएमसी, तर वाघूर धरणात १.१४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. वाघूरच्या लाभक्षेत्रात १३९ मिलिमीटर पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून, आजअखेर या प्रकल्पांमध्ये १४.८२ दलघमी म्हणजेच ०.५२ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com