agriculture news in Marathi,Maha cyclone become calm, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची तीव्रता वाढली..!

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पुणे : ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना निवळले असून, गुरुवारी (ता. ७ ) दुपारपर्यंत किनाऱ्यालगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. या प्रणालीमुळे गुजरात, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण झाले होते. तर राज्याच्या काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ होऊन पावसाळी ढग गोळा होऊ लागले होते. आज (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना निवळले असून, गुरुवारी (ता. ७ ) दुपारपर्यंत किनाऱ्यालगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. या प्रणालीमुळे गुजरात, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण झाले होते. तर राज्याच्या काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ होऊन पावसाळी ढग गोळा होऊ लागले होते. आज (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तापमानात वाढ कायम आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर, बुलडाण्यात तापमान ३० अंशांच्या खाली आहे, तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा तिशीपार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल ३० ते ३४ अंश, तर किमान तापमान १७ ते २५ अंशांच्या आसपास होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (०.९), नगर ३१.६ (०.५), जळगाव ३३.५ (०.०), कोल्हापूर २९.७ (-१.१), महाबळेश्वर २४.५ (-१.१), मालेगाव ३१.६ (-०.७), नाशिक ३२.४ (१.०), सातारा ३०.८ (१.३), सोलापूर ३२.८ (१.१), अलिबाग ३०.५ (-२.९), डहाणू ३२.० (-१.०), सांताक्रूझ ३२.८ (-१.४), रत्नागिरी ३३.२ (-०.६), औरंगाबाद ३१.४ (०.६), परभणी ३२.१ (१.०), नांदेड ३३.० (१.२), अकोला ३३.३ (१.०), अमरावती ३४.२ (२.१), बुलडाणा २८.० (-१.१), ब्रह्मपुरी ३३.९ (२.८), चंद्रपूर ३२.६ (१.२), गोंदिया ३१.० (-०.१), नागपूर ३३.३ (२.१), वर्धा ३३.० (१.५), यवतमाळ ३२.० (१.६).

‘बुलबुल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढतेय
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. ओडिशाच्या परादीपपासून ६८० किलोमीटर आग्नेयेकडे, पश्‍चिम बंगालच्या सागर बेटापासून ७८० किलोमीटर दक्षिणेकडे ही प्रणाली घोंगावत होती. आज (ता. ८) वादळ अतितीव्र होणार असून, ते पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्यांकडे जाण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


इतर बातम्या
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
नाशिक : खरीप पीकविमा योजनेसाठी ३१...नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...