agriculture news in Marathi,Maha cyclone become fast, Maharashtra | Agrowon

‘महा’चक्रीवादळाची तीव्रता वाढतेय; दोन दिवस राज्यात हलका पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पुणे : अरबी समुद्रातील ‘क्यार’ चक्रीवादळापाठोपाठ आलेले ‘महा’चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. सोमवारपर्यंत (ता.४) हे वादळ पश्चिमेकडे खोल समुद्राकडे सरकणार आहे. त्यानंतर पुन्हा गुजरातच्या किनाऱ्याकडे माघारी फिरण्याचे संकेत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. ५) राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे; तर वादळ किनाऱ्याकडे येताना बुधवारपासून (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.    

‘क्यार’ चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे गेल्यानंतर निवळले आहेत; तर पूर्व-मध्य अरबी समुद्रात ‘महा’चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली गुजरातच्या वेरावळपासून ५४०, तर दीवपासून ५५० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात आहे. हे वादळ पश्चिमेकडे सककत असून, त्याची तीव्रताही वाढत आहे. सोमवारपर्यंत ते पुन्हा माघारी फिरून गुजरातच्या किनाऱ्याकडे येणार आहे. याकाळात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळणार असून, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवार आणि सोमवारी राज्यात पावसाचा जोर ओसरून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

राज्यात असलेल्या पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. पाऊस पडत असलेल्या भागात दिवसाचे कमाल तापमान तीस अंशांच्या खाली आले आहे; तर पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी तापमान तिशापार गेले असून, शनिवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
 
इतर अॅग्रो विशेष
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...