दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
अॅग्रो विशेष
‘महा’चक्रीवादळ किनाऱ्याकडे झेपावतेय
पुणे : अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. आजपासून (ता. ५) हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येणार आहे. बुधवारी (ता. ६) रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि पोरबंदरदरम्यान किनारपट्टीला धडकणार असल्याने किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १३० ते १५५ किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्रात उंच लाटा निर्माण होणार आहेत. बुधवारपासून गुजरात, उत्तर कोकण किनारपट्टीवर अतिजोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ६७०, तर दीवपासून ७१० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६५० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात घोंगावत आहे. आजपासून (ता. ५) या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून, ते गुजरातच्या किनाऱ्याकडे झेपावणार आहे. बुधवारी (ता. ६) रात्री उशिरा चक्रीवादळ ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने दीव आणि पोरबंदरदरम्यान गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून अतिउंच लाटा उसळणार आहेत. तसेच बुधवारी (ता. ६) आणि गुरुवारी (ता. ७) गुजरात, उत्तर कोकणातील डहाणू आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रात सोमवारी (ता. ४) कमी दाब क्षेत्राची तीव्रता निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, ते पूर्व किनारपट्टीकडे येण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. पहाटे पडणारे धुके आणि गारा वारा यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. सोमवारी सकाळी राज्यात किमान तापमान १६ ते २३ अंशांदरम्यान होते. पुढील आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, ठाणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (०.०), जळगाव ३२.२ (-१.३), कोल्हापूर ३०.२ (-०.६), महाबळेश्वर २३.५ (-२.१), मालेगाव २९.६ (-२.७), नाशिक ३०.२ (-१.२), सांगली ३१.८ (०.२), सातारा ३१.१ (१.६), सोलापूर ३३.२ (१.५), अलिबाग ३१.८ (-१.७), डहाणू ३२.७ (-०.३), सांताक्रूझ ३२.७ (-१.७), रत्नागिरी ३१.८ (-२.०), औरंगाबाद ३०.४ (-०.२), परभणी ३०.८ (०.३), अकोला ३२.२ (-०.१), अमरावती ३१.६ (-०.५), बुलडाणा २३.८ (३.७), ब्रह्मपुरी ३४.८ (३.७), चंद्रपूर ३२.६(१.२), गोंदिया ३१.६ (०.५), नागपूर ३३.८ (२.६), वर्धा ३२.५ (१.०), यवतमाळ ३१.० (०.६).
- 1 of 657
- ››