agriculture news in Marathi,Maha cyclone coming to coastline, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘महा’चक्रीवादळ किनाऱ्याकडे झेपावतेय

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पुणे : अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. आजपासून (ता. ५) हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येणार आहे. बुधवारी (ता. ६) रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि पोरबंदरदरम्यान किनारपट्टीला धडकणार असल्याने किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १३० ते १५५ किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्रात उंच लाटा निर्माण होणार आहेत. बुधवारपासून गुजरात, उत्तर कोकण किनारपट्टीवर अतिजोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

पुणे : अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. आजपासून (ता. ५) हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येणार आहे. बुधवारी (ता. ६) रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि पोरबंदरदरम्यान किनारपट्टीला धडकणार असल्याने किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १३० ते १५५ किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्रात उंच लाटा निर्माण होणार आहेत. बुधवारपासून गुजरात, उत्तर कोकण किनारपट्टीवर अतिजोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

 अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ६७०, तर दीवपासून ७१० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६५० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात घोंगावत आहे. आजपासून (ता. ५) या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून, ते गुजरातच्या किनाऱ्याकडे झेपावणार आहे. बुधवारी (ता. ६) रात्री उशिरा चक्रीवादळ ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने दीव आणि पोरबंदरदरम्यान गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून अतिउंच लाटा उसळणार आहेत. तसेच बुधवारी (ता. ६) आणि गुरुवारी (ता. ७) गुजरात, उत्तर कोकणातील डहाणू आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.  

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रात सोमवारी (ता. ४) कमी दाब क्षेत्राची तीव्रता निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, ते पूर्व किनारपट्टीकडे येण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. पहाटे पडणारे धुके आणि गारा वारा यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. सोमवारी सकाळी राज्यात किमान तापमान १६ ते २३ अंशांदरम्यान होते. पुढील आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, ठाणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.  

 सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (०.०), जळगाव ३२.२ (-१.३), कोल्हापूर ३०.२ (-०.६), महाबळेश्वर २३.५ (-२.१), मालेगाव २९.६ (-२.७), नाशिक ३०.२ (-१.२), सांगली ३१.८ (०.२), सातारा ३१.१ (१.६), सोलापूर ३३.२ (१.५), अलिबाग ३१.८ (-१.७), डहाणू ३२.७ (-०.३), सांताक्रूझ ३२.७ (-१.७), रत्नागिरी ३१.८ (-२.०), औरंगाबाद ३०.४ (-०.२), परभणी ३०.८ (०.३), अकोला ३२.२ (-०.१), अमरावती ३१.६ (-०.५), बुलडाणा २३.८ (३.७), ब्रह्मपुरी ३४.८ (३.७), चंद्रपूर ३२.६(१.२), गोंदिया ३१.६ (०.५), नागपूर ३३.८ (२.६), वर्धा ३२.५ (१.०), यवतमाळ ३१.० (०.६).


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...