agriculture news in Marathi,`Maha` cyclone hit coastline today, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला आज धडकणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे: अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ आज (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. आज (ता. ६) गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

पुणे: अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ आज (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. आज (ता. ६) गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. 

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकामागून एक चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या ‘क्यार’ वादळानंतर ‘महा’ चक्रीवादळ आले आहे. तर पाठोपाठ बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्राजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ७) या भागात ‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली काही काळ ओडिशाच्या दिशेने येऊन, नंतर उत्तरेकडे पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत आहेत.

 

इतर अॅग्रो विशेष
अवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील...नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील...
साठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्शपुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...
काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणारसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी,...
द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूलनाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास...
कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....
गारठा वाढला; नगर येथे नीचांकी तापमानपुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे,...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...
कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन...नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर...
हळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...
शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणार अनुदानपुणे ः शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-...
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...