Maze Market News : जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून मका खरेदी बंद

शासनाकडे मका साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने संग्रामपूरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मका खरेदी बंद आहे. तर खरेदी विक्री संस्थेच्या आवारात शेतकऱ्यांचा दोन हजार क्विंटल मका मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे.
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून मका खरेदी बंद Maize purchase stopped for five days in Sangrampur due to lack of space
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून मका खरेदी बंद Maize purchase stopped for five days in Sangrampur due to lack of space

संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने संग्रामपूरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मका खरेदी बंद आहे. तर खरेदी विक्री संस्थेच्या आवारात शेतकऱ्यांचा दोन हजार क्विंटल मका मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे.  दरम्यान, खरेदी विक्री संस्थेकडून तहसीलदार यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रही देण्यात आले आहे. मोजमापात होत असलेल्या विलंबामुळे ऑनलाइन नोंदणी झालेली असतानाही मका उत्पादकांना नाइलाजाने हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मका विकण्याची वेळ निर्माण झाली आहे.  शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासनाने नाफेडअंतर्गत भरड धान्य खरेदी योजना सुरू केली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्यानुसार संग्रामपूरमध्ये तालुका खरेदी विक्री संस्थेच्या आवारात मका खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे १२००  शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. यापैकी २८ नोव्हेंबरपर्यंत १७७ शेतकऱ्यांचा सहा हजार ५७६ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. २२० शेतकऱ्यांना संदेश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक भास्कर निंबोळकर यांनी दिली. सद्यःस्थितीत खरेदी विक्री संस्थेच्या आवारात दोन हजार क्विंटल मका मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शासनाने तातडीने मका साठवणुकीसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. संस्थेचे गोदाम फुल्ल, दुसरी व्यवस्था नाही ! खरेदी विक्री संस्थेचे गोदाम आधीच फुल्ल झालेले असल्याने खरेदी केलेला मका ठेवायचा तरी कुठे असा प्रश्‍न पडला आहे.  जास्त क्षमता असलेले गोदाम तालुक्याच्या ठिकाणी नसल्याने शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेसाठी मोठा अडथळा ठरत आहे. काही पतसंस्थांनी या परिसरात मोठ्या क्षमतेचे गोदाम उभे केले आहेत. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू होण्यापूर्वीच या गोदामांमध्ये आपल्या मालाची साठवणूक केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com