Agriculture news in marathi,Major damage to lakes in Shirala taluka | Agrowon

शिराळा तालुक्यातील तलावांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

शिराळा, जि. सांगली  ः तालुक्यात या अनेक तलावांचे नुकसान होऊन पावणे तीन कोटींचा फटका बसला आहे.

शिराळा, जि. सांगली  ः तालुक्यात या अनेक तलावांचे नुकसान होऊन पावणे तीन कोटींचा फटका बसला आहे. तालुक्यातील मोरणा धरण, करमजाई, मानकरवाडी, शिवाणी, टाकवे, तर वाळवा तालुक्यातील रेठरे धरण व कार्वे हे सात प्रकल्प जलसंपदा विभागांतर्गत येतात. हे प्रकल्प चाळीस वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.

संततधार पावसामुळे मोरणा धरणाच्या सांडव्याखालील बाजूस तीन ठिकाणी भरावा खचून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या ठिकाणी ८०० मीटर लांबीची दोन कोटी २० लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. वाकुर्डे बुद्रूक येथील करमजाई तलावाच्या गेटजवळ खालील बाजूस मोठ्या खड्डा पडून रस्ता खचला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपये खर्च येणार आहे. अंत्री येथील मानकरवाडी तलावाच्या सांडवा भिंतीची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यासाठी ३५ लाख खर्च अपेक्षित आहे. अशी सध्यास्थितीला दोन कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे.

पावसामुळे तलावांच्या संरक्षण भिंती, सांडवा भिंत यांची पडझड झाल्याने त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. जवळपास त्यासाठी पावणे तीन कोटी रुपयांची गरज आहे. उर्वरित तलावाची असणारी किरकोळ दुरुस्ती यांचा विचार केला, तर जवळपास दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- लालासाहेब मोरे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, इस्लामपूर.

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोरणा धरणाच्या सांडव्याच्या पाण्याने प्रवाह बदलला. त्यामुळे दोन एकर जमीन खचून वाहून गेली. दोन एकर क्षेत्रातील ऊस पीक, ठिबक सिंचन पाइप, विद्युत मोटार वाहून गेले. त्यामुळे २० लाखांचे नुकसान झाले. या परिसरातील शेती वाचवण्यासाठी शेती खचलेल्या भागात संरक्षण भिंत घालणे गरजेचे आहे.
- प्रवीण शेटे, शेतकरी.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...